Anna Bansode : मृतदेह अदलाबदलीमुळे आमदार बनसोडे संतापले; व्यवस्थाच बदलाची केली मागणी

Anna Bansode : आयुक्तांनी या घटनेप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून तिला आठवड्यात अहवाल देण्यास सांगितले आहे.
Anna Bansode
Anna Bansodesarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील मृतदेह अदलाबदलीमुळे या रुग्णालयाचा भोंगळ कारभार काल (ता.१९) चव्हाट्यावर आला. त्यानंतर स्थानिक आमदार अण्णा बनसोडे यांनी संतप्त होत या घटनेचा तीव्र निषेध केला. एवढेच नाही, तर 'वायसीएम'च्या आस्थापनेतच बदलाची मागणी त्यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना पत्र लिहून आज (ता.२०)केली.

आमदार बनसोडे (Anna Bansode) यांच्या पिंपरी मतदारसंघातील दापोडीच्या रहिवासी स्नेहलता गायकवाड यांचे भिंत अंगावर पडून गुरुवारी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी YCM मध्ये आणण्यात आला होता. नंतर त्यांच्या नातेवाईकांना दुसऱ्याच महिलेचा मृतदेह शवागारातून देण्यात आला. त्यांनी त्यावर अंत्यसंस्कारही केले. त्यानंतर अंत्यसंस्कार झालेल्या महिलेचे नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी आले. असता मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे समजले.

Anna Bansode
अनिल देशमुखांची दिवाळी घरी की कोठडीत? उद्या होणार निर्णय...

त्यानंतर अंत्यसंस्कार झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी YCM रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केली होती. या घटनेचा निषेध करूनच बनसोडे थांबले नाहीत. तर त्यांनी घसरत चाललेल्या वायसीएमचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी उपायही सुचवले आहेत. या रुग्णसेवा आणि पदव्युत्यर शिक्षण हे स्वतंत्र करण्याची मागणी केली आहे. रुग्णसेवा विभाग हा वैद्यकीय अधिक्षकांकडे, तर पदव्यूत्यर शिक्षण संस्थेचा कारभार अधिष्ठाता (डीन) यांच्याकडे आणि प्रशासन व निविदाविषयक कामकाज उपायुक्तांकडे देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यामुळे रुग्णसेवा, शिक्षण आणि प्रशासन गतिमान होऊन नागरिकांना चांगली सेवा मिळू शकेल, असे ते म्हणाले. केसपेपर सुविधा ऑनलाईन करून रुग्णशुल्कही तसेच स्वीकारण्याची वा त्यासाठी अॅप विकसित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सर्दी, खोकला, ताप, चिकनगुणिया, डेंगीसारख्या आजारांचे प्रमाण वाढलेले असताना त्याबाबत पालिका प्रशासानाचा नियोजन शून्य कारभार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Anna Bansode
रविकांत तुपकर म्हणाले, त्यांनी भाव मिळवून घेतला; आता आपली ताकद दाखवण्याची वेळ...

मृतदेह अदलाबदलीच्या गंभीर घटनेला जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी बनसोडेंनी आयुक्तांकडे केली आहे. एवढेच नाही, तर या प्रकाराला जबाबदार अधिकारी आणि विभागप्रमुखांचे निलंबन करून रुग्णालयाचे डीन तथा अधिष्ठाता डॉ. वाबळे यांच्याही चौकशीचा आग्रह त्यांनी धरला आहे.

ही चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. वाबळेंचा पदभार काढून घ्यावा आणि त्यांचे आर्थिक अधिकार गोठवावेत, असेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, आयुक्तांनी या घटनेप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून तिला आठवड्यात अहवाल देण्यास सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com