Ncp News : मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीतून प्रवास अन् बंद दाराआड चर्चा

CM Eknath Shinde News : हे दोन्ही खासदार, आमदार पक्षात नाराज असल्याची चर्चा खूप अगोदरपासून सुरु आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama

Pimpri-Chinchwad News : संसदेच्या अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलावलेल्या राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकूनही शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे तिला उपस्थित राहिल्याने काल त्याची मोठी राजकीय चर्चा झाली. ती निवळायच्या आत याच पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी, तर थेट मुख्यमंत्र्यांच्या मोटारीतूनच प्रवास केल्याने ही दुसरी चर्चा आज रंगली.

हे दोन्ही खासदार, आमदार पक्षात नाराज असल्याची चर्चा खूप अगोदरपासून सुरु आहे. त्यात पक्षाच्या बैठकांना अनेकदा त्यांनी दांडी मारल्याने या चर्चेने मूळही धरले होते. पण, त्या त्या वेळी या दोघांनीही तसे काही नसल्याचे व आजारी असल्याने वा इतर कारणांमुळे गैरहजर राहिल्याचे सांगितले होते. या चर्चेचा धसका खुद्द पक्षाचे नेते अजित पवार यांनीही घेतला होता.

Eknath Shinde News
Pimpri-Chinchwad Ncp News : तर 'चिंचवड' बिनविरोध करू, राष्ट्रवादीने घेतली महत्त्वाची भूमिका

कारण त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या एका दौऱ्यात सुरवातीलाच बनसोडेंकडे अंगुलीनिर्देश करीत हा बघा अण्णा उपस्थित आहे नाही, तर तुम्ही... असे विधान केले होते. त्यामुळे एकच चर्चा रंगली होती.

राज्य कॅबिनेटची बैठक असल्याने मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी बनसोडे मुंबईला गेले होते. पण, त्यांना ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यबाहूल्यामुळे (बिझी शेड्यूल) मांडता आले नाही. मंत्रालयातील एका कार्यक्रमालाही हे दोघे उपस्थित होते. मात्र, तेथेही त्यांना बोलता आले नाही. म्हणून शेवटी सायंकाळी पाच वाजता ठाण्याकडे (घरी) निघताना मुख्यमंत्र्यांनी बनसोडेंना स्वताच्या गाडीत घेतले.

Eknath Shinde News
Chinchwad By Election : 'आमदार जगताप हयात असतानाच भाजपची सुरू होती निवडणुकीची तयारी!'

अर्धा तास या दोघांत मोटारीतच चर्चा झाली. नंतर, ठाणे येथील निवासस्थानीही ते बोलले. मात्र, दोघांच्या या बंद दारामागील चर्चेत पिंपरीतील प्रलंबित प्रश्नच चर्चिले गेले की दुसरे काय, हे मात्र कळू शकले नाही. कारण बनसोडेंशी संपर्क करूनही तो झाला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com