कृष्णप्रकाश यांची बदली होताच आमदार अण्णा बनसोडे यांनाही कंठ फुटला!

Krishna Prakash | Anna Bansode : अण्णा बनसोडे यांच्या मुलावर कृष्णप्रकाश यांनी केलेली कारवाई गाजली होती
Krishna Prakash | Anna Bansode
Krishna Prakash | Anna BansodeSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे (Pimpri Chinchwad) माजी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांनी वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून २०० कोटी रुपयांची वसुली केल्याचे पत्र काल (ता. ६) चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर फक्त पोलिस दलातच नव्हे, तर शहरातही प्रचंड खळबळ उडाली. कृष्ण प्रकाश यांचे रिडर म्हणून काम केलेले एपीआय डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाने व सहीने हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवण्यात आलेले होते. पण काही वेळातच हे पत्र बनावट असल्याचा खुलासा स्वत: डोंगरे यांनी केला. तर, रात्री उशिरा स्वतः कृष्णप्रकाश यांनीही हे पत्र केवळ बदनामीसाठी व्हायरल केल्याचे स्पष्ट केले.

या पहिल्या लेटरबॉम्बचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच कृष्णप्रकाश यांच्यावर आज दुसरा लेटरबॉम्ब पडला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंनी कृष्णप्रकाशांची कारकिर्द संशयास्पद असल्याचा आरोप करत नवीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात कृष्णप्रकाश यांच्या काळातील अनेक अवैध उद्योग घडले असाही आरोप आमदार बनसोडे यांनी केला आहे. त्यामुळे कृष्णप्रकाशांच्या काळात नेमके काय घडलं, याचं गूढ वाढलं आहे. दरम्यान, जुन्या आयुक्तांच्या संशयास्पद कारभाराची नवे आयुक्त दखल घेणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Krishna Prakash | Anna Bansode
उर्जा विभागाची तत्परता! थकीत वीजबिलाच्या यादीतून अजित पवारांचे नाव २ तासात हटवलं

अण्णा बनसोडे यांनी पत्रात काय म्हटले आहे?

सवंग प्रसिद्धीतून नामांकित बॅंकांच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे नोंदवून मोठी रक्कम उकळणे, जमिनीचे ताबे मारून भागीदारी आणि फ्लॅट घेणे असे प्रकार कृष्णप्रकाश यांच्या काळात घडल्याचा दावा आ. बनसोडे यांनी आपल्या पत्रात केला आहे. दिवाणी प्रकरणात गुन्हे दाखल करून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले. झोपडपट्यांतील गरीब तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मागासवर्गीय कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि मागासवर्गीय अधिकाऱ्यांची गळचेपी करून त्यांच्यावर खोट्या कारवाया करणे असे गैरप्रकार कृष्णप्रकाश आयुक्त असताना शहरात झाल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

तसेच मसाज सेंटरवरील पोलिस कारवाईत सापडलेल्या मुलींचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याची बाब आ. बनसोडेंनी नव्या पोलिस आयुक्तांच्या कानावर या पत्रातुन घातली आहे. कृष्णप्रकाश यांच्या अगोदरचे आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या काळात अवैध धंदे बोकाळले होते. हफ्तेवसुली होत होती. म्हणून त्याविरुद्ध आणि वसूली रॅकेटविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिल्याने बिष्णोईंची बदली झाली व कृष्णप्रकाश आले, असा दावा आ. बनसोडे यांनी केला आहे.

Krishna Prakash | Anna Bansode
आमदार, खासदार, मंत्र्यांकडे लाखोंची वीजबिल थकीत; जयकुमार गोरे यादीत अव्वलस्थानी!

सुरुवातीस कृष्णप्रकाश यांनी अवैध धंदे बंद करून दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्याची त्यांनी प्रसिद्धी करवून जनतेची वाहवा मिळवली. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली तक्रार सार्थकी लागले असे वाटले. पण, नंतर उलटेच घडले. जनतेच्या सहानुभूतीच्या जोरावर खोटे गुन्हे दाखल होऊ लागले, जमिनीचे ताबे मारण्यात येऊ लागले, दुसऱ्याने केलेली कामे स्वताच्या नावे खपवून प्रसिद्धी मिळवणे असे गैरप्रकार सुरु झाले. पूर्वीच्या आयुक्तांचा हा चेहरा जनतेसमोर उघड झाला पाहिजे. पण, दहशतीमुळे ते शक्य नाही, अशी खंतही आ. बनसोडे व्यक्त केली.

आपण प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून काम करणारे अधिकारी असल्याने शहरातील गु्ंडगिरी, अवैध धंदे, लॅण्डमाफियांना आळा घालून शहर सुरक्षित करालं, असा आशावाद त्यांनी नव्या आयुक्तांकडून व्यक्त केला आहे. लोकप्रतनिधी म्हणून चांगल्या कामाचे कौतूक करू, त्यासाठी आपल्यासोबत खंबीरपणे राहू, असा शब्दही त्यांनी नव्या आयुक्तांना पत्राच्या शेवटी दिला आहे.

अण्णा बनसोडे यांच्या मुलावर कृष्णप्रकाश यांनी केली होती कारवाई :

दरम्यान. गतवर्षी आमदार बनसोडे यांचा मुलगा मुलगा सिद्धार्थ बनसोडे (Siddharth Bansode) याला कृष्णप्रकाश यांनी अटक केली होती. त्यावेळी या कारवाईची प्रचंड चर्चा झाली होती. खुनाच्या प्रयत्नांच्या दोन गुन्ह्यांत सिद्धार्थ संशयित आरोपी असल्याचे पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले होते.

आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात १२ मे रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. तत्पूर्वी सिद्धार्थ व त्याच्या साथीदारांनी हा गोळीबार करणारा पिंपरी चिंचवड शहरातील कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा व्यवस्थापक तानाजी पवार या माजी सैनिकाचे त्याच्या आकुर्डीतील कंपनीतून अपहरण केले होते. त्याला चिंचवड स्टेशन येथील आमदारांच्या कार्यालयात आणून बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com