PCMC Red Zone News : पिंपरीत रेड झोन'वरुन राजकारण तापलं; राष्ट्रवादीचे भाजपवर गंभीर आरोप

रेझझोनव्दारे लोकांमध्ये भीती निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचा भाजपचा धंदाच झाला आहे
PCMC Red Zone News | Ajit Pawar
PCMC Red Zone News | Ajit Pawar

Pimpri-Chinchwad News : खडकी आणि देहूरोड दारुगोळा कारखाना आणि कोठारामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून दोन रेड झोन असल्याने लाखभर रहिवाशी बाधीत आहेत. त्यात आता तिसरा रेड झोन (संरक्षित क्षेत्र) करण्याचे भाजपचे कटकारस्थान सुरु असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) केला आहे.

रावेत, किवळे, निगडी प्राधिकरण येथील हा प्रस्तावित तिसरा रेडझोन रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. त्यामुळे त्याबाबत संरक्षण खात्याने नुकताच सादर केलेला प्रस्ताव पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी संरक्षण खात्याचा हा प्रस्ताव फेटाळून लावावा,अन्यथा मोठे आंदोलन उभे केले जाईल,असा इशारा राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिला आहे.

PCMC Red Zone News | Ajit Pawar
Winter Session : पंतप्रधान मोदींवर टिप्पणी! अभिजीत वंजारी अन् प्रसाद लाड भिडले

रावेत, किवळे येथील उंच इमारतींचा देहूरोड दारूगोळा कारखान्याला धोका निर्माण होत असल्यामुळे कारखाना सीमाभिंतीपासून दोन हजार यार्ड म्हणजे १.८२ किलोमीटरचा परिघ रेडझोन करण्याची मागणी संरक्षण विभागाने केली आहे. तसे झाले,तर किवळे-रावेत या ७० टक्के विकसित भागातील हजारो रहिवासी, व्यावसायिक आणि भूमीपुत्र देशोधडीला लागतील.या परिसरातील जमिनींचे,घरांचे मूल्य कवडीमोल होऊन बँका मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी कर्ज देणार नाहीत,असे गव्हाणे म्हणाले.

रेझझोनव्दारे लोकांमध्ये भीती निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचा भाजपचा धंदाच झाला आहे,असा हल्लाबोल गव्हाणेनी केला.आगामी पिंपरी महापालिका निवडणूक जिंकण्याची शक्यता नसल्याने त्यांनी हे षडयंत्र रचले असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

खडकी आणि देहूरोड दारूगोळा कारखाना व कोठारामुळे उद्योगनगरीच्या दिघी-भोसरी या भागात पहिला,तर रुपीनगर, तळवडे, त्रिवेणीनगर, यमुनानगर, ओटा स्कीम, देहूरोड येथे दुसरा रेडझोन आहे.त्यामुळे मोठ्या संख्येने रहिवाशी त्रस्त आहेत.परिणामी या झोनची हद्द कमी करण्याचे भाजपचे आश्वासन हवेतच विरले असताना त्यांनी तिसऱ्या रेडझोनची तलवार आता लटकवली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

भाजप नेत्यांनी २०१४ व २०१९ च्या विधानसभेत व त्यानंतर २०१७ च्या पिंपरी पालिका निवडणुकीत रेडझोन रद्द कमी करण्याचे आश्वासन देऊन मते मिळवली,पण हा प्रश्न सोडविलाच नाही.केवळ मतांसाठी रेडझोन सोडवणार असा कांगावा करायचा आणि निवडणूक संपली की पुन्हा त्या विषयावर बोलायचेच नाही,अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in