राष्ट्रवादी नेत्यांचं विनयभंग प्रकरण : राणेंनी दिलेली ४८ तासांची डेडलाईन संपली; भूमिकेकडे लक्ष

Nitesh Rane News : आरोपींना पकडण्यासाठी आमदार राणेंनी ४८ तासांचा कालावधी दिला होता...
Nitesh Rane
Nitesh Rane Sarkarnama

Nitesh Rane News : दौंड (जि. पुणे) : ॲट्रोसिटी आणि विनयभंग प्रकरणातील संशयित आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) नेता तथा माजी नगराध्यक्ष बादशह शेख याच्यासह फरारी आरोपींना पकडण्यासाठी आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी पोलिसांना ४८ तासांचा कालावधी दिला होता. ४८ तास संपल्याने आमदार राणे यांच्या पुढील भूमीकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर त्यांनी दौंड (Daund) पोलिसांवरही अनेक गंभीर आरोप केले होते.

विनयभंग व ॲट्रोसिटी प्रकरणातील संशयित आरोपी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फरार नेता बादशहा शेख यास पकडण्याची मागणी करीत आमदार नितेश राणे यांनी १७ नोव्हेंबर रोजी दौंड पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. ९ नोव्हेंबरपासून संशयित आरोपी बादशहा शेख फरार असल्याने राणे यांनी अटकेसाठी ४८ तासांचा अवधी देत पोलिस व फरार आरोपींचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता.

Nitesh Rane
मुख्यमंत्र्यांसोबत एका मंचावर कसे आले होते? लळीत यांनी दिले स्पष्ट उत्तर

दरम्यान, नितेश राणे यांच्या आंदोलन व आरोपानंतर पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांची प्रशासकीय बाब, असे कारण देत तडकाफडकी मुख्यालयात बदली केली. आंदोलनानंतरचे ४८ तास संपल्याने या प्रकरणात आक्रमक झालेले नितेश राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Nitesh Rane
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींना आवरला नाही भजी तळण्याचा मोह ; सोलापुरी जेवणाचा घेतला आस्वाद!

तिघांना लोणावळ्यातून अटक....

तरूणीचा विनयभंग व ॲट्रोसिटी प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इलियास इस्माईल शेख (वय ३१), वाहिद जावेद खान (वय २१) व सुफियान उर्फ जुम्मा रमजान शेख (वय २०, तिघे रा. कुंभार गल्ली, दौंड) या तिघांना ताब्यात घेतले. एकूण वीस आरोपींपैकी यापूर्वी जिलानी शेख या संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याने आता अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे, अशी माहिती दौंडचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com