Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा महिला सरपंचांना मोलाचा सल्ला

Supriya Sule : 'महिलांनो गाव कारभारात तु्म्ही सक्षम व्हा, पतीचे मार्गदर्शन घ्या, पण निर्णय तुम्हीच घ्या...'
Supriya Sule
Supriya Sule Sarkarnama

नसरापूर (जि.पुणे) : महिलांना निर्णय प्रक्रियेत सामावण्यासाठीच महिला आरक्षण निर्माण झाले आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी पतीच निर्णय घेतात असं नाही झालं पाहीजे. यासाठी महिलांनो गाव कारभारात तु्म्ही सक्षम व्हा, पतीचे मार्गदर्शन जरुर घ्या, परंतु निर्णय तुम्हीच घ्या, असे अवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर-वेल्हे तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच सदस्यांच्या सत्कार प्रसंगी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भोर व वेल्हे तालुक्यातील नवनिर्वाचितांचा सत्कार समारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते धांगवडी येथील बळीराजा मंगल कार्यालयात अयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला खासदार सुळे यांच्या समवेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, जिल्हा महिला अध्यक्षा भारती शेवाळे, ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष चाकणकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, निर्मला जागडे, दुध संघाचे संचालक भगवान पासलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, वंदना धुमाळ, माजी सभापती सुनिता बाठे, मानसिंग धुमाळ, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नवनिर्वाचित सरपंच सदस्य उपस्थित होते.

Supriya Sule
Abdul Sattar : सत्तारांवर निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचाही आरोप..

सुळे पुढे म्हणाल्या की, ''तुम्हाला गावच्या विकासाची संधी मिळाली आहे, तीचे सोने करा प्रामाणिकपणे काम करा. राजकारणात आपण कशासाठी आलो तर गावच्या व ग्रामस्थांच्या विकासासाठी मात्र सध्याचे राज्यातील राजकारण विकास बाजूला ठेवून फारच गलिच्छ झाले आहे.

छत्रपती यांच्यासह फुले, आंबेडकर, कर्मवीर, सावित्रीबाई यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केली जातात. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमाप्रश्नावर काहीही बोलत आहेत. मात्र हे ईडी सरकार काहीच बोलत नाही. उलट फडणवीस सर्वांना पाठिशी घालतात, चुकीच्या गोष्टीचा निषेध करत ऩाहीत हे योग्य नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Supriya Sule
Ajit Pawar : 'सोमेश्वर'च्या उपाध्यक्षपदासाठी अजित पवार कोणाला संधी देणार? 'ही' नावे आघाडीवर

प्रदीप गारटकर यांनी जिल्ह्यात 230 जागांपैकी राष्ट्रवादीने 131 जागांवर विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यामध्ये देखील राष्ट्रवादी एक नंबरलाच राहील. पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, विरोधकांनाही आपलंस करुन गावचा विकास साधा, असे अवाहन त्यांनी केले.

चंद्रकांत बाठे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. बोलताना त्यांनी तालुक्यात 54 पैकी दोन जागी निवडणूक झाली नाही. उर्वरीत 52 पैकी 24 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्याची माहीती दिली. तर किरण राऊत यांनी वेल्हे तालुक्यात 28 पैकी 12 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com