'कंगनाची हुजरेगिरी करणाऱ्यांनी चुकीचे आरोप करू नयेत'

मावळचे राष्ट्रवादीचे (NCP)आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी भाजपनेते (BJP)अतूल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांच्यावर जोरदार टीका केली होती.
Atul Bhatkhalkar & Sunil Shelke
Atul Bhatkhalkar & Sunil ShelkeSarkarnama

पिंपरी : मावळ तालुक्यातील (जि.पुणे) लोहगडावर राष्ट्रवादीचे (NCP) स्थानिक आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी कोरोना (Covid-19) काळात उरुस भरवून जातीय तेढ निर्माण केल्याने त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी भाजपचे (BJP) प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी नुकतीच (ता.१० जानेवारी) केली. तसेच, ही राष्ट्रद्रोहाचीच कृती असून त्यानुसारही शेळके विरुद्ध कारवाईसाठी भाजप प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले होते. प्रत्यक्षात असा उरुसच झालेला नाही. तसेच, त्याच्याशी आपला दुरान्वयेही सबंध नसल्याचे शेळके यांनी मंगळवारी (ता.११ जानेवारी) स्पष्ट केले.

Atul Bhatkhalkar & Sunil Shelke
भाजप सोडताच बड्या नेत्याला मोठा झटका! 24 तासांतच निघालं अटक वॉरंट

यावर आमदार शेळके म्हणाले, अभिनेत्री कंगना राणावत हिची हुजरेगिरी करणाऱ्या भातखळकरांनी चुकीचे आरोप करू नयेत. तसेच, न झालेल्या उरुसाची अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शेळके म्हणाले, आमदार असल्याने भातखळकरांनी जबाबदारीने वक्तव्य करायला पाहिजे. त्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी अभ्यासपूर्वक बोलावे. तसेच, पुन्हा असे वक्तव्य केल्यास त्यांनी मावळमध्ये येऊन दाखवावे त्यांना त्यांची जागा दाखवून देवू, असे आव्हानही शेळकेंनी दिले.

Atul Bhatkhalkar & Sunil Shelke
`मुंडे साहेबानंतर भाजपमध्ये अवहेलना; म्हणूनच पक्ष सोडतोय; पंकजांनीही निर्णय घ्यावा`

दरम्यान, जुने व्हिडिओ समाजमाध्यमांवर पसरवून लोहगडावरील उरुस मी आयोजित केल्याचा आरोप काही समाजकंटक करत आहेत. ते चुकीचे असल्याचे शेळके म्हणाले. लोहगडावर न झालेल्या उरुसाची अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करु नये. राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम अटींचे पालन आम्ही करत आहोत.अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करु नये. तसेच, प्रसारमाध्यमांनी देखील खातरजमा न करता चुकीची बातमी प्रसारित करु नये,असे आवाहन शेळकेंनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in