दगड डोक्यावर ठेवला की छातीवर, हा त्यांचा प्रश्न ; चंद्रकांतदादांवर पवारांची टोलेबाजी

सुरक्षा पुरवण्याचा निर्णय मंत्रीमंडळ घेत नाही. पोलिस महासंचालकांची एक उच्च स्तरिय समिती याबाबतचा निर्णय घेते.
sharad pawar, Chandrakant Patil
sharad pawar, Chandrakant Patilsarkarnama

पुणे : एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी देऊनही त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरक्षा पुरवली नाही, असा गंभीर आरोप काल (शुक्रवार) शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या सुरक्षेसंबंधीच्या वादात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी भाष्य केलं आहे. (Sharad Pawar latest news)

शरद पवार म्हणाले, "मला वस्तुस्थिती माहित नाही.पण सरकारमध्ये अनेक वर्ष काम केल्याने मला हे माहिती आहे की सुरक्षा पुरवण्याचा निर्णय मंत्रीमंडळ घेत नाही. पोलिस महासंचालकांची एक उच्च स्तरिय समिती याबाबतचा निर्णय घेते. या समितीमध्ये मुख्य सचिव, गृह सचिव आदींचा समावेश असतो. सुरक्षेबाबत एखाद्या व्यक्तीने मागणी केल्यास या समिती प्रथम तपासणी करते. नंतरच संबंधित व्यक्तीला सुरक्षा पुरवण्यात येते,"

sharad pawar, Chandrakant Patil
गोगावलेंचे चंद्रकांतदादांना सडेतोड उत्तर ; भाजप-शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस बाहेर

"कोणाला सुरक्षा द्यायची की नाही याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात हा विषय चर्चेला येऊ दिला नाही, हा आरोप साफ खोटा आहे,"असे पवार म्हणाले.

"एकनाथ शिंदे यांना ठाकरे सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली होती की नाही? याबाबत मी कालच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यांनीदेखील शिंदे यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा दिल्याचे सांगितले. माजी गृहमंत्र्यांनी हे सांगितलं त्यामुळे अधिक काही बोलायची गरज नाही," असे सांगत शरद पवारांनी शिंदे गटाचे आरोप खोडून काढले.

"मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झाले, पण आपण दुःख पचवून पुढे गेलो. कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता," असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यावर पवार यांनी टोलेबाजी केली.

"दगड डोक्यावर ठेवला की छातीवर. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे," असे म्हणत पवारांनी चंद्रकांतदादांवर टोलेबाजी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com