'अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती...'

Ramdev Baba News : 'रामदेव बाबांना पुण्यात आल्यावर काळं फसणार...'
Ramdev Baba News
Ramdev Baba NewsSarkarnama

Ramdev Baba News : ''महिला साडी आणि सलवारमध्ये चांगल्या दिसतात. त्यांनी काही घातलं नाही तरी त्या चांगल्या दिसतात'', असं महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य योगगुरु रामदेव बाबा यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात केलं. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवरच बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी संतप्त होत ''अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती', अशी प्रतिक्रिया दिली.

त्या म्हणाल्या, 'महिलांनी काय घालायाचं आणि काय नाही, हा त्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. बाबा रामदेव यांचं हे वक्तव्य अमृता फडणवीस यांच्या समोर झालं. त्याच वेळी अमृताताईंनी त्यांच्या कानाखाली ओढायला पाहिजे होती. महिलांनी साडी सलवार घालणे हे समजू शकतो, पण त्यांच पुढचं विधान कितपत योग्य आहे?'' असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी जोरदार टीका केली.

Ramdev Baba News
"लाईन तोडू नका, नाहीतर मी रट्टे द्यायला लावीन.." संतोष बांगरांची दमदाटी...

''रामदेव बाबा यांच हे वक्तव्य घाणेरडं आहे. रामदेव बाबा तुम्ही डोकं खाली आणि पाय वर करा. मग तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित होईल. रामदेव बाबांना अक्कल नाही. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आम्ही ते पुण्यात आल्यावर त्यांना काळं फसणार आहोत'', असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला.

''गृहखात्याने रामदेव बाबा यांच्यावर तात्काळ कारवाई करायला हवी'', अशी मागणी करत ''भाजपशी संबंधित लोक महिलांचा वारंवार अपमान करतात'', अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, योगगुरु रामदेव बाबा हे आज ठाण्यात योगासनाचे धडे देत होते. यावेळी त्यांनी महिलांबद्दल हे आक्षेपार्ह वक्तव्य केलं. याचवेळी अमृता फडणवीस (amruta fadnavis) या देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com