गोव्यातील विजयाचे श्रेय घेणाऱ्या लांडगेंनी कोल्हापुरातील पराभवाची जबाबदारी स्वीकारावी!

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत सुमारे 19 हजारांच्या मताधिक्क्याने काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांचा विजय झाला.
Ravikant Warpe, Mahesh Landage
Ravikant Warpe, Mahesh Landagesarkarnama

पिंपरी : नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत म्हापसा विधानसभेची जागा आपणच जिंकून आणल्याचा, तसेच गोव्यात भाजपची सत्ता येण्यामध्ये आपला खारीचा वाटा असल्याचे सांगत विजयाचे श्रेय घेणारे भाजपचे (BJP) पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) हे कोल्हापुरातील भाजप उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्विकारणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Warpe) यांनी केला आहे.

Ravikant Warpe, Mahesh Landage
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; चंद्रकांत पाटलांनी बोलले तसे वागावे...शंभूराज देसाई

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत सुमारे 19 हजारांच्या मताधिक्क्याने काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांचा विजय झाला, तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना पराभव स्विकारावा लागला. निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर वरपे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून, त्यात म्हटले आहे की, गोव्यात भाजपच्या उमदेवाराचा प्रचार करणारे लांडगे हे सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात तळ ठोकूण बसले होते. तसेच भाजपचाच विजय होणार, असे दावे करत होते. मात्र, धर्मांध मुद्यांच्या आधाराव प्रचार करणार्‍या भाजपला शाहू महाराजांची विचारसरणी आजही जपणार्‍या कोल्हापुरकरांनी त्यांची खरी जागा दाखविली आहे.

गोव्यात भाजपच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर लांडगे यांनी गोव्यात भाजपची सत्ता येण्यात आपण वाटा उचलल्याचा दावा करतानाच त्याचे श्रेय लाटले होते. पत्रके काढून प्रसिद्धीही मिळविली होती. आता कोल्हापुरात लांडगे यांनी प्रचार केल्यानंतरही पराभव झाल्याने त्याची जबाबदारी स्विकारण्याची तयारी दाखविण्याचे धाडस त्यांनी दाखवावे, असे आव्हानच वरपे यांनी दिले आहे.

Ravikant Warpe, Mahesh Landage
कोल्हापूरच्या जनतेने भाजपच्या धर्मांध राजकारणाला नाकारले... बाळासाहेब थोरात

कोल्हापुरची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवडमध्ये होणार 

भाजपच्या नेत्यांनी इतरांना पुढे करून कितीही भोंगे वाजविले आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी जनता सुजाण आहे हेच कोल्हापूरच्या निकालावरून स्पष्ट झाले. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भोंगे बहाद्दरांकडून असाच प्रकार घडवून जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा तसेच त्यातून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडची जनता भाजपचे डाव ओळखून असल्याने धर्मांध मुद्यांना स्थान न देता विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादीला साथ देईल व भाजपचा करेक्ट कार्यक्रम करेल. कोल्हापुरच्या विजयाची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवडमध्ये होईल, असा विश्वास वरपे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com