' दिल्लीश्वराच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकणार नाही '

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर टीका केली आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

मावळ : आज तळागाळात पक्ष उभा होत आहे. एक-एक कार्यकर्ता पक्षाशी जोडला जात आहे. पक्षाकडे तरुणांची मोठी फळी निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र हा राष्ट्रवादीमय असणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला आहे. ते मावळ येथे बोलत होते.

ही मावळची भूमी आहे. इथली माती शिवरायांचे शौर्य आपल्याला सांगते. दिल्लीश्वर कितीही कपटी असला कितीही कारस्थानी असला तरी महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. ही परंपरा शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू आहे ती यापुढेही कायम राहील, असा आत्मविश्वास पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.

Jayant Patil
२०२४ ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा आहे; तयारीला लागा : जयंत पाटील

पाटील म्हणाले, आपलं सरकार काहींच्या डोळ्यात सलत आहे. त्यामुळे आधी आमदार विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आता मंत्र्यांवर धाडी टाकल्या जात आहे. अनिल देशमुख यांना खोट्या आरोपात गोवलं आता नवाब मलिकांना खोट्या आरोपात गोवले आहे. मलिक एनसीबी विरोधात बोलत होते म्हणून त्यांना त्यांची भूमिका मांडू न देता अटक करण्यात आली. जाणिवपूर्वक दाऊदचे नाव घेतले गेले आणि एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला तुरुंगात टाकल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

तुम्ही याची नोंद घ्या, आम्ही ठामपणे सांगतो की, महाविकास आघाडी ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आली आहे. कोणीही किती अडथळे आणले तरी महाराष्ट्र सरकार आपले काम पूर्ण करणार, अश्या शब्दात पाटलांनी भाजपला सुनावले.

Jayant Patil
'हा' बंगाल पॅटर्न किंवा महाराष्ट्र पॅटर्न असेल- आदित्य ठाकरे

आमच्या पक्षात आता सुनील शेळके, रोहित पवार, निलेश लंके असे तरुण लोक नेतृत्व करत आहे आणि चांगली जबाबदारी पार पडत आहे. तुमच्या सर्वांच्या ताकदीने सुनीलअण्णा शेळके जवळपास १ लाख मतांच्या लीडने निवडून आले. ९०० कोटींचा त्यांनी निधी मिळवला आहे. अजून अडीच वर्षे बाकी आहेत. मावळचा कायापालट करण्याचे काम करू कारण तुमचा माणूस हा माणसासाठी झटणारा नेता आहे, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, संकटाचा काळ आता संपलेला आहे, आता काळ आपल्या प्रगतीचा आहे. या मावळचा विकास शेळकेंच्या नेतृत्वाखाली होईल, अशी खात्री पाटलांनी यावेळी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com