पालिका निवडणूक आल्याने भाजप शहराध्यक्ष आ. लांडगेंना लघुउद्योजकांचा पुळका`

PCMC Politics |आपल्या सत्ताकाळात एकही समस्या सोडवू न शकलेल्या भाजपच्या नेतृत्त्वाने आपल्याच अपयशाचा आरसा दाखविला
Ajit Gavhane, Mahesh Landge
Ajit Gavhane, Mahesh Landgesarkarnama

MLA Mahesh Landge news पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांच्या विविध प्रलंबित समस्यांना गती देत त्यापैकी अनेक मार्गी लावण्यात आल्या असून येथील लघुउद्योगांना शिंदे-फडणवीस सरकारने ‘रेड कार्पेट’टाकल्याचा दावा काल शहर भाजपचे (BJP) अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी (ता.२३) केला होता.त्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी गुरुवारी (ता.२४)घेतला. भाजपच्या भरकटलेल्या नेतृत्त्वाने स्वत:च्या अपयशाचा आरसा दाखविला, असा हल्लाबोल त्यांनी केला.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मुंबईत पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील लघुउद्योगांच्या प्रतिनिधींची आ. लांडगे यांच्या पुढाकाराने काल बैठक झाली.त्यानंतर वरील दावा त्यांनी केला होता. त्यावर बोलताना या बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने लघुउद्योजकांच्या तोंडाला पाने पुसली गेल्याचा हल्लाबोल गव्हाणेंनी केला. या बैठकीत पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्याचा फार्स करण्यात आला. आपल्या सत्ताकाळात एकही समस्या सोडवू न शकलेल्या भाजपच्या नेतृत्त्वाने आपल्याच अपयशाचा आरसा दाखविला, असे ते म्हणाले.

Ajit Gavhane, Mahesh Landge
Ajit Pawar : अपघात झालेल्या कार्यकर्त्याच्या मदतीला दादा आले धावून!

गेल्या पाच वर्षांत भाजपला लघुउद्योजकाची एकदाही आठवण झाली नाही. मात्र आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने भाजपचे शहराध्यक्ष आ.लांडगे यांना लघुउद्योजकांचा पुळका आला आहे,अशी कडवट टीका त्यांनी केली.या बैठकीतून लघुउद्योजकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचाच प्रकार झाला आहे. केवळ आश्वासने आणि सूचना यापलिकडे बैठकीत काहीच झाले नाही. एकाही विषयावर ठोस निर्णय झालेला नसतानाही ‘रेडकार्पेट’च्या गप्पा भाजपच्या नेत्यांकडून मारल्या जात आहेत, असे ते म्हणाले.

गल्ली ते दिल्ली सत्ता उपभोगणार्‍या भाजप नेत्यांनी लघुउद्योजक आणि त्यांच्या समस्यांकडे दूर्लक्ष केल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील लघुउद्योजकांना त्रास सहन करावा लागतो आहे,असा आरोपही गव्हाणेंनी केला.शास्तीकर, रेडझोन, खंडीत वीज या समस्या उद्योग विभागांतर्गत येतात का? याची जाणीवही नसणारे लोक बैठका घेऊन समस्या सोडविल्याचा फार्स करतात. यावरून त्यांची धडपड ही प्रश्न सुटावी म्हणून नव्हे, तर आगामी पालिका निवडणुकीतील पराभव टाळण्यासाठी आहे.

त्यामुळे कितीही नवीन गाजरे दाखविली तरी शहरातील जनता आणि लघुउद्योजक भाजपला येत्या महापालिका निवडणुकीत जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. रेडझोनचा प्रश्न सोडविण्याचे आणि शास्तीकर माफ करण्याचे आश्वासन भाजपने दिले.मात्र,गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचे सरकार असूनही त्यांना ते सोडविण्यात अपयश आले.त्यामुळे नवी ‘गाजरे’ दाखविण्याऐवजी गेल्या पाच वर्षांत शहरात काय काम केले त्याचा हिशोब त्यांनी जनतेसमोर मांडावा, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in