Ajit Pawar : उद्धव ठाकरे शिस्तीत वागणारे.. पण शिंदे ? : अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar latest news : यांच्या निष्काळजीपणाची किंमत लोकांना मोजावी लागत आहे.
Ajit Pawar News in Marathi, NCP News, CM Eknath Shinde News in Marathi,
Ajit Pawar News in Marathi, NCP News, CM Eknath Shinde News in Marathi, सरकारनामा

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. (Ajit Pawar latest news)

"उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शिस्तीने वागायचे. मात्र आता वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. कायदे करणारे राज्यकर्तेच जर नियम मोडत असतील तर सर्वसामान्य जनतेने काय करायचे, असंही बोलणारा एक वर्ग असतो. त्यामुळे सर्वांनी कायद्याचं पालन करावं," असं अजित पवार म्हणाले. ते काल (शनिवारी) पुण्यात बोलत होते.

काही दिवसापूर्वी शिंदे पुणे दौऱ्यावर होते. तेव्हा ते एका रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत होते. तेथे त्यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. ही काय घोषणा देण्याची जागा आहे का? तेथे शांतता ठेवायची असते याचे भान कार्यकर्त्यांना नाही आणि मुख्यमंत्रीही त्यांना काही सांगितले नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना शिंदे शिस्तीत वागत होते, परंतु, आता मात्र वेगळेच बघायला मिळत आहे, हे थांबेल पाहिजे, अशा शब्दात शिंदेंचा पवारांनी समाचार घेतला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यावेळी उपस्थित होते.

Ajit Pawar News in Marathi, NCP News, CM Eknath Shinde News in Marathi,
Shahaji Patil : शहाजीबापूंनी अजितदादांना सुनावलं ; म्हणाले, "काळजी करु नका.."

टीईटी परीक्षा घोटाळा, आरोग्य भरतीची ईडीकडून चौकशी होणार आहे, त्यावर अजित पवार म्हणाले, "ईडी, सीबीआय, एनआयए यासह केंद्राची व राज्य शासनाची कोणतीही यंत्रणा चौकशी करू शकते, त्यांना माहिती मिळाली, पुरावे मिळाली तर पुढील कारवाई करू शकतील. ज्या झारीतील शुक्राचार्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,"

अजित पवार म्हणाले, "राज्यात मंत्री मंडळ नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, महिलांवर अत्याचार होत असताना त्यांना वाली कोणीच नाही. यांच्या निष्काळजीपणाची किंमत लोकांना मोजावी लागत आहे. यासाठी तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली का याचे उत्तर लोकांना द्या,"

"लोणावळ्या जवळील गावात मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला, भंडाऱ्यात महिलेवर सामुहिक बलात्कार झाला अशा प्रकारच्या घटना घडत असताना हे प्रकरण हाताळण्यासाठी गृहमंत्री, गृहराज्यमंत्री असणे आवश्‍यक आहे. पण सध्या कोणीचवालीच नाही. त्यामुळे अशा घटनामुळे निष्पाप लोकांना किंमत मोजावी लागत आहे," असे पवार म्हणाले.

"कोरोनाने दोन वर्ष वाया गेले आहेत. आता इयत्ता ११वीचे प्रवेश सुरू झाले आहेत, पण अनेक विर्द्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. नव्या तुकडीची मान्यता देण्याची मागणी आहे, पण त्याचा निर्णय मंत्री नसल्याने होत नाहीत. अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत," असे अजित पवार यांनी सांगितले. सचिवांना मंत्र्याचे अधिकार दिले असतील तर मुख्य सचिवांनाच सर्व अधिकार देऊन टाका म्हणजे मुख्यमंत्र्यांनाही काम काही राहणार नाही, असा टोला पवार यांनी लागावला.

अजित पवार म्हणाले..

  • "मंत्रिमंडळाचा विस्तार करणे तुमचा अधिकार आहे. विस्तार करा, पालकमंत्र्यांची नियुक्ती करा.

  • राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. मंत्रिमंडळ आल्याशिवाय प्रशासनावर अंकुश निर्माण होणार नाही.

  • राज्यपालांना भेटून मंत्रिमंडळ स्थापन करून अधिवेशन घ्या अशी मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com