नाथाभाऊंच्या पिंपरी भेटीने राष्ट्रवादीला आले उसने अवसान..

पिंपळे गुरव येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी एकनाथ खडसे (Eknath Khadse) उद्योनगरीत आले होते.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

पिंपरी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गुरूवारी (ता.३ फेब्रुवारी) पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. यावेळी भाजपचे (BJP) आजी, माजी सभागृहनेते नामदेव ढाके व एकनाथ पवार यांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपला भगदाड पडून राष्ट्रवादीला (NCP) ताकद मिळणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून या भेटीनंतर करण्यात आला. भाजपचे वीस, बावीस नगरसेवक संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. त्यावर राष्ट्रवादीचे हे उसने अवसान असून उलट आमचे शंभऱाहून अधिक नगरसेवक निवडून येणार असल्याचा प्रतिदावा एकनाथ पवार यांनी शुक्रवारी (ता.४ फेब्रुवारी) केला. तर, ही कौटुंबिक भेट होती, असे मूळचे खान्देशवाशी असलेले ढाके यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.

Eknath Khadse
महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला सर्वाधिक लोकप्रिय तर, सर्वोत्तम चित्ररथाचा मान या राज्याला..

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता २०१७ मध्ये गेल्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते उसणे अवसान आणत आहेत. मात्र, देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे भाजपाला सोनेरी दिवस आहेत. त्यामुळे आमच्या १०० पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असा दावा पवार यांनी नाथाभाऊंच्या शहरभेटीनंतर उठलेल्या वावटळीवर बोलताना केला. पालिका निवडणुकीसाठी प्रभाग कसेही होवोत. भाजपाकडे प्रत्येक प्रभागात प्रभावी उमेदवार आहेत. भाजपाकडून ज्यांना उमेदवारी मिळणार नाही. त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट घ्यावे लागेल. त्यामुळे भाजपचे २०-२२ नगरसेवक भाजपातून बाहेर पडतील, हा राष्ट्रवादीचा दावा खोटा ठरणार आहे. उलट, राष्ट्रवादीतील काही नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहेत, असा दावाही केला.

गेली ३० वर्षे शहरात भाजपाची मूल्ये रुजवण्यासाठी आम्ही संघर्ष केला. त्यामुळे आम्ही पक्षासोबत आहोत, राष्ट्रवादीने आपले नगरसेवक सांभाळावेत, असा त्यांनी दिला आहे. खडसे भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते आहेत. गेल्या ३० वर्षांपासून आम्ही भाजपाच्या पक्ष संघटनेत काम करीत आहोत. त्यामुळे खडसे यांच्यासोबत कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. आज खडसे राष्ट्रवादीत असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाला निश्चितपणाने सोनेरी दिवस आहेत. त्यामुळे खडसे यांनी पुन्हा भाजपात यावे, अशी विनंतीही आम्ही त्यांना केली. विशेष म्हणजे, खडसे माझ्या घरी भेट देणार आहेत, ही बाब मी माझ्या पक्षश्रेष्ठींच्या कानावरही घातली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना कितीही उकळ्या फुटत असल्या, तरी त्यांचा भ्रमनिरास होईल, असेही पवार यांनी म्हटले आहे.

Eknath Khadse
video : 'गावठी गुळाची वाईन विक्रीला परवानगी द्यावी'

गोल़्डमन म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सकपाळ यांच्या पिंपळे गुरव येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी खडसे उद्योनगरीत आले होते. त्यावेळी पवार व ढाके यांनी त्यांची भेट घेताच त्याची मोठी चर्चा झाली. त्यासंदर्भात ढाके म्हणाले, आम्ही भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. ज्येष्ठ नेते खडसे यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध निश्चितपणाने आहेत. त्याची भेट हा कौटुंबिक विषय आहे. मात्र, राष्ट्रवादीला भाजपाला खिंडार पडणार आहे, अशी स्वप्ने पडत आहेत. परंतु, राष्ट्रवादीकडे अनेक प्रभागांमध्ये उमेदवार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपातून बाहेर पडणाऱ्यांची प्रतीक्षा करीत उत्सव निश्चित साजरा करावा. तसा रोज कार्यक्रम करावा, त्याला आमचा आक्षेप नाही. पण, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे दोन्ही आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com