प्रशांत जगतापांच्या महापौरपदाच्या काळातच पुण्यात राष्ट्रवादीने सत्ता गमावली - NCP has lost power in Pune during the Mayorship of Prashant Jagtap | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

प्रशांत जगतापांच्या महापौरपदाच्या काळातच पुण्यात राष्ट्रवादीने सत्ता गमावली

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 जून 2021

राष्ट्रवादी कॉग्रेसने काहीही केले तरी महापालिकेत पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार,

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या महापौरपदाच्या काळातच राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुणे महाापलिकेतील सत्ता गेली होती. जगताप यांच्या चुकीच्या कारभारामुळेच पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीकडे सत्ता सोपविली आहे. हे जगताप यांनी ध्यानात घ्यावे, अशी टीका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. राष्ट्रवादी कॉग्रेसने काहीही केले तरी महापालिकेत पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार, असा विश्‍वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

‘सरकारनामा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना महापौर मोहोळ यांनी महापालिकेची गेल्या चार वर्षातील कामगिरी तसेच आगामी निवडणुकांच्या संदर्भाने सविस्तर मुलाखत दिली. ते म्हणाले, ‘‘ मेट्रो, नव्या गावांतील विकासकामांचे नियोजन, नदी सुधारणा प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना यासारख्या योजना तसेच कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रश्‍न, पुण्याच्या पूर्वभागासाठी भामा आसखेडची पाणी योजना, पुण्याला चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची योजना या प्रमुख गोष्टी गेल्या चार वर्षात मार्गी लागल्या आहेत. कोरोनामुळे विकास कामांवर परिणाम झाला. मात्र, कोरोनाचा सक्षमपणे मुकाबला करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. तिसरी लाट येणार असे गृहीत धरून त्याचा मुकाबला करण्यासाठी आवश्‍यक तयारी करण्यात येत आहे.संकटाच्या काळात पुणेकरांच्या अडचणी दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत आहोत. या काळात विरोधी पक्ष टीका करण्यापलिकडे काहीही करत नाहीत.’’

हेही वाचा : तेवीस गावांच्या समावेशानंतर कशी असेल पुणे शहराची हद्द; जाणून घ्या...

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आगामी काळात महापालिका तसेच नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. महापालिकांसांठी एक किंवा दोनची प्रभाग पद्धती आंमलात आणण्याचा विचार सरकार करीत आहे. यावर बोलताना महापौर मोहोळ म्हणाले,‘‘ राज्य सरकारने कोणतीही प्रभाग पद्धती आमलात आणली तरी पुण्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता पुन्हा येणार यात कोणतीही शंका नाही.महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र लढले तरी आमचे यश ते रोखू शकणार नाहीत. महापालिकेत पुन्हा बहुमताने सत्तेत येणार आहोत.’’

राष्ट्रवादी कॉंगेसचे शहराध्यक्ष जगताप यांच्या टीकेला उत्तर देताना महापौर माहोळ म्हणाले, ‘‘ जगताप यांच्या महापौरपदाच्या काळात राष्ट्रवादीला पुण्यात सत्ता गमवावी लागली आहे. आता पुन्हा निवडणुकांचा सामना करताना आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षात त्यांच्याबरोबर कितीजण आहेत याची काळजी करावी. टीका करताना केवळ प्रसिद्धीसाठी इतर पक्षांच्या राज्य व देश पातळीवरील नेत्यांवर टीका करण्याची जगताप यांची सवय जुनीच आहे. वास्तविक त्यांनी पुण्याचे प्रश्‍न व पुण्यातल्या राजकारणावर बोलणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ प्रसिद्धीसाठी ते मोठ्या नेत्यांविषयी बोलत असतात.’’

Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख