राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या मंत्र्यांना पैसे खाण्याचे प्रशिक्षण देतो : गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

एका गंजाडी पोरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar sarkarnama

केडगाव (जि. पुणे) : पैसे कसे खायचे, याचे प्रशिक्षण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मंत्र्यांना देत असते. एका गंजाडी पोरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. टीव्ही लावला की, हाच विषय दिसतो. एसटी कामगार व शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांना दिसत नाही. शेतकऱ्यांपेक्षा सरकारला आर्यन खान महत्वाचा वाटत आहे. राज्यात दुसरे विषय नाहीत का, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. (NCP give training its ministers to eat money : Gopichand Padalkar's serious allegation)

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील भांडगाव येथे ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पडळकर बोलत होते. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, कांचन कुल, ज्येष्ठ कीर्तनकार सुमंतबापू हंबीर, हरिभाऊ पाटसकर, ज्ञानदेव ताकवणे, उपसरपंच नीलम दोरगे, लक्ष्मण काटकर, लक्ष्मण दोरगे, राहुल खळदकर, रवींद्र दोरगे, रामदास दोरगे आदी उपस्थित होते.

Gopichand Padalkar
सहकार हा राज्याचा विषय, केंद्र सरकार त्यावर अतिक्रमण करत आहे

पडळकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे. राज्य सरकारच्या अनेक खात्यात मंत्री भष्ट्राचार करीत आहे. खाते कुठलेही असो खाता आले पाहिजे. राष्ट्रवादीने बिनखात्याचा मंत्री केला तरी तो खाऊ शकतो इतके भारी प्रशिक्षण राष्ट्रवादी त्यांच्या मंत्र्यांना देत असते. राज्यात नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आघाडी सरकारचे लक्ष नाही. कोविड महामारी रोखण्यावर लक्ष नव्हते. शेतकरी व एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवर लक्ष नाही. आरोग्य खात्याच्या परीक्षेवर लक्ष नाही.

सहकारी साखर कारखाने यांनीच अडचणीत आणायचे आणि नंतर लिलाव काढून कवडीमोल किमतीने ते विकत घ्यायचे यावर सरकारचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींनी राज्यातील ५५ साखर कारखाने कवडीमोल किमतीने विकत घेतले आहेत. ज्या तालुक्यात मंत्रिपदे नाहीत, तेथील निधी बारामती तालुक्यात वळविला आहे. हा इतर तालुक्यांवर अन्याय आहे. पुरोगामी या गोंडस शब्दाचा वापर करत ही मंडळी राजकारण करत असतात. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव फक्त मतांसाठी घ्यायचे, असा टोलाही त्यांनी पडळकर यांनी लगावला.

Gopichand Padalkar
सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच स्वतःची उमेदवारी जाहीर केली अन्‌ मुश्रीफांनी त्यांना विजयीही घोषित केले!

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कुल यांच्या कामाचे कौतुक केले. पुरस्कार समितीचे अध्यक्ष शाम कापरे, विजय दोरगे, प्रमोद दोरगे, रवींद्र जाधव, संदीप दोरगे यांनी संयोजन केले.

कोरोनाकाळात दौंड राष्ट्रवादीने काय केले?

या वेळी राहुल कुल यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले ७५० मतांवर निवडून आलो आहे. आमच्याकडे कुठलीही मोठी संस्था नसताना आमच्या प्रयत्नांतून ३१०० कोरोना रूग्णांना मोफत उपचार मिळवून दिले. आमच्या विरोधकांची पुणे जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता असताना यांनी एकाही गावात कोविड सेंटर सुरू केले नाही. मग यांनी केले काय? भीमा-पाटस कारखान्याबाबत येत्या १५ दिवसांत सकारात्मक निर्णय होईल. कारखाना चालू केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही कुल यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com