भोरमध्ये राष्ट्रवादीचा थोपटेंना धक्का; सरपंचपदासह दोन्ही ग्रामपंचायतींवर फडकवला झेंडा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठलराव आवाळे यांचे भोलावडे हे गाव आहे. त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक आवाळे यांना राष्ट्रवादीने गावातच चारीमुंड्या चित केले आहे.
NCP-Sangarm Thopte
NCP-Sangarm ThopteSarkarnama

भोर (जि. पुणे) : पुणे जिल्ह्याच्या भोर (Bhor) तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) आपला झेंडा फडकावला. तालुक्यातील भोलावडे आणि किवत या दोन ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. काँग्रेस पक्षाचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठलराव आवाळे यांचे भोलावडे हे गाव आहे. त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक आवाळे यांना राष्ट्रवादीने गावातच चारीमुंड्या चित केले आहे. (NCP dominates two gram panchayats in Bhor taluka)

जनतेतून थेट सरपंच निवडीतही राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भोलावडे ग्रामपंचायत ही ११ सदस्यांची असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल ९ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस पक्षाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर नव्याने अस्त्विात आलेल्या किवत ग्रामपंचतीच्या सात जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळविला आहे, तर काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली आहे.

NCP-Sangarm Thopte
कटकारस्थान करून त्यावेळी मला मुख्यमंत्रिपदावरून काढलं अन्‌ राज्यपाल केलं : सुशीलकुमार शिंदेंचा स्वकीयांवर हल्ला

भोलावडे ग्रामपंचायतीमधून किवत हे गाव स्वतंत्र झाले आहे. त्यामुळे भोलावडेबरोबर किवत ग्रामपंचायतीसाठीही रविवारी मतदान झाले होते. किवत ग्रामपंचायतीची ही पहिलीच निवडणूक होती. गावपातळीवरील मतदान असल्याने ते अत्यंत चुरशीने झाले होते. दोन्ही बाजूंकडून प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली होती. मात्र, मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. आवाळे यांना आपल्याच गावात पराभव पत्करावा लागला आहे.

NCP-Sangarm Thopte
योगेश कदमांनी बंड केले अन्‌ सूर्यकांत दळवींची राजकीय साडेसाती संपली!

भोलावडे ग्रामपंचायतींवर यापूर्वी आवाळे गटाचे वर्चस्व होते. तो मोडून काढण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. भोलावडे आणि किवत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. विशेष म्हणजे थेट सरपंच निवडीतही राष्ट्रवादीने बाजी माारली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच हे दोन्ही राष्ट्रवादीकडे आल्याने ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com