राज्य बाजार समितीच्या शिखर संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम !

राज्य बाजार समिती ही राज्यातील बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.
Mahesh Tapase
Mahesh Tapase Sarkarnama

पुणे : राज्य बाजार समिती संघावर महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे.राज्य बाजार समिती ही राज्यातील बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या समितीवर राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहिला आहे. दरम्यान, जनतेचा राष्ट्रवादीवर आणि शरद पवार यांच्या कृतीशील विचारांवर विश्वास आहे, हे यावरून स्पष्ट दिसत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी व्यक्त केली.

Mahesh Tapase
भिमालेंच्या उद्यान नामकरणाच्या विषयात आमदार मिसाळ लक्ष घालणार !

राज्य बाजार समिती संघ ही राज्यातील बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. राज्यातील राजकारणात वेळोवेळी बदल झाले असले तरी गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बाजार समित्यांच्या माध्यमातून राज्यातील जनतेने विश्‍वास ठेवल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.

Mahesh Tapase
अमित शहांनी दोन मुख्यमंत्र्यांना समोर बसवलं अन् पन्नास वर्षांपासूनचा वाद मिटला

या शिखर संस्थेवर महाविकास आघाडी सरकारने २१ पैकी १७ जागा जिंकत वर्चस्व प्राप्त केले आहे. यामध्ये राष्ट्रवादीने ९ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रविवारी २७ मार्च रोजी या संस्थेचा निवडणूक निकाल जाहीर झाला असून भाजपला यामध्ये पाचचा आकडाही गाठता आला नाही, अशी टीका तपासे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे. गृहमंत्र्यांचा हा निर्णय अत्यंत योग्य असल्याचे सांगत तपासे यांनी वळसे-पाटील यांचे आभार मानले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com