Grampanchayat Result : पुणे जिल्ह्यातील ६१ पैकी ४६ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

आंबेगावमध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरमध्ये आमदार अतुल बेनके, खेडमध्ये आमदार दिलीप मोहिते या आमदारांनी आपले गड कायम राखले आहेत.
NCP
NCPSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : पुणे जिल्ह्याच्या (Pune district) उत्तर भागात एकूण ६१ ग्रामपंचायतच्या (Grampanchayat) पंचवार्षिक निवडणुकीचा (Election) निकाल आज (ता. १९ सप्टेंबर) लागला. या निकालात तब्बल ४६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) वर्चस्व मिळविले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradip Garatkar) यांनी दिली. (NCP dominance over 46 gram panchayats in Pune district : Pradip Garatkar)

याबाबत माहिती जिल्हाध्यक्ष गारटकर म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात जुन्नर तालुक्यातील एकूण ३६ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने २६ ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आंबेगाव तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायत या राष्ट्रवादीच्या विचाराच्या आल्या आहेत. तसेच, खेड तालुक्यात पाच ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायती, भोर तालुक्यातील दोनपैकी दोन्हीही ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या आलेल्या आहेत, असा दावा जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी केला आहे.

NCP
Grampanchayat Election : आंबेगावात १४ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले; मात्र शिंदे गटानेही खाते उघडले

आंबेगावमध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरमध्ये आमदार अतुल बेनके, खेडमध्ये आमदार दिलीप मोहिते या आमदारांनी आपले गड कायम राखले आहेत, तर भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला धक्का दिला आहे.

NCP
भोरमध्ये राष्ट्रवादीचा थोपटेंना धक्का; सरपंचपदासह दोन्ही ग्रामपंचायतींवर फडकवला झेंडा

गारटकर म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार दिलीप मोहिते,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, विक्रम खुटवड यांच्या विचाराने विकास कामाच्या जोरावर ग्रामीण भागापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा ग्रामपंचायतने ग्रामपंचायतीच्या निकालातून दिसून येत आहे.

NCP
Grampanchyat Election : महाजनांना जळगावमध्येच धक्का : राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गटाचे वर्चस्व; भाजप-काँग्रेसला भोपळा

या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावांचा सर्वागीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी निवडणुकीच्या निकालानंतर सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com