Chinchwad By Election : राष्ट्रवादीने केला करेक्ट कार्यक्रम; इच्छूकालाच केले प्रचारप्रमुख

NCP News : राष्ट्रवादीचा `चिंचवड`च्या प्रचाराचा नारळ उद्या मोरया गोसावीच्या दर्शनाने फुटणार
Chinchwad Vitthal Kate
Chinchwad Vitthal KateSarkarnama

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांच्या प्रचार प्रमुखपदी पक्षाचे शहरातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांची आज नियुक्ती करण्यात आली. ते चिंचवडमधून इच्छूक होते. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी ही नेमणूक केली.

Chinchwad Vitthal Kate
Karnataka Assembly Election : राष्ट्रवादीचा निर्धार, बेळगावात दोन जागा जिंकणार

भोईर यांनी २००९ ची विधानसभा निवडणूक चिंचवडमधून लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. यामुळे यावेळी ते पुन्हा शर्यतीत होते. मात्र, काटेंना उमेदवारी मिळाल्याने त्यांचा प्रचार आता भोईरांना करावा लागणार आहे. या नियुक्तीवर काटे शंभर टक्के निवडून येतील, असा प्रचार करणार आहे, अशी प्रतिक्रिया भोईर यांनी `सरकारनामा`शी बोलताना दिली.

मी पक्षाचा आदेश पाळतो. त्यामुळे हा ही आदेश पाळणार आहे, असे ते म्हणाले. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे, असे सांगत उमेदवारी न मिळाल्याने नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Chinchwad Vitthal Kate
Praniti Shinde : "जातीपातीतून निवडून आलेल्या खासदारांनी शहराचा पाणी प्रश्नही सोडवला नाही!"

दरम्यान, कालच्या अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने चिंचवडमधील उमेदवारांनी प्रचारास जोरात सुरवात केली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार काटे हे आपल्या प्रचाराची सुरवात उद्या (ता.१२) सकाळी पिंपरी-चिंचवडचे ग्रामदैवत मोरया गोसावींचे दर्शन घेऊन करणार आहेत.

यावेळी पक्षाचे चिंचवडचे निरीक्षक आणि मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह आजी, माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com