Cricketnama : मुंडे अन् तटकरेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने उडवला काँग्रेसचा धुव्वा

Sarkarnama | Cricketnama : धनंजय मुंडे अन् अनिकेत तटकरेंची निर्णायक खेळी
Cricketnama
CricketnamaSarkarnama
Published on

पुणे : एरव्ही राजकीय मैदानात जोरदार गोलंदाजी-फलंदाजी करणाऱ्या राजकीय नेत्यांची काल (शनिवारी) क्रिकेटच्या मैदानातली कामगिरी जोरदार गाजली. प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानावरही जोरदार फटकेबाजी झाली. पहिला सामना भाजप-शिवसेनेमध्ये झाल्यानंतर दुसरा सामना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) रंगला. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा धुव्वा उडवला.

काँग्रेसच्या टीमचे कॅप्टन आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे होते.
काँग्रेसच्या टीमचे कॅप्टन आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे होते. Sarkarnama
राष्ट्रवादी काँग्रेसची क्रिकेट टीम
राष्ट्रवादी काँग्रेसची क्रिकेट टीम
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस सामन्यापूर्वी एकत्र
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस सामन्यापूर्वी एकत्र

पहिल्यांदा फलंदाजी करताना राष्ट्रावादी काँग्रेसची सुरुवात अडखळत झाली. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बाद झाल्यानंतर अनिकेत तटकरें यांनी जोरदार फलंदाजी करत २१ चेंडूत २४ धावांची फटकेबाजी केली. राष्ट्रवादीकडून काँग्रेसला ६१ धावांचे आव्हान देण्यात आले होते.

काँग्रेसचीही अडखळती सुरुवात झाली. पुरंदरचे धुरंदर आमदार संजय जगताप ३ धावा करुन बाद झाले. धनंजय मुंडेंनी त्यांची विकेट काढली. मात्र, राजकीय मैदानात चचपडणारी काँग्रेस क्रिकेटच्या मैदानातही चचपडताना दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसने ३३ धावांनी विजयी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com