धनंजय मुंडे अन् अनिकेत तटकरेंची निर्णायक खेळी; राष्ट्रवादीचा काँग्रेसवर ३३ धावांनी विजय

अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी जोरदार फलंदाजी करत २१ चेंडूत २४ धावांची फटकेबाजी केली.
धनंजय मुंडे अन् अनिकेत तटकरेंची निर्णायक खेळी; राष्ट्रवादीचा काँग्रेसवर ३३ धावांनी विजय
Dhananjay Munde, Sangram Thopte, Aniket Tatkaresarkarnama

पुणे : एरव्ही राजकीय मैदानात जोरदार गोलंदाजी फलंदाची करणारे राजकीय नेत्यांची क्रिकेटच्या मैदानातली कामगिरी जोरदारपणे रंगली. मैदानावरही जोरदार फटकेबाजी झाली. पहिला सामना भाजप-शिवसेनेमध्ये झाल्यानंतर दुसरा सामना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) रंगला.

काँग्रेसच्या टीमचे कॅप्टन आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) होते. राष्ट्रावादी काँग्रेसची सुरुवात अडखळत झाली. सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बाद झाल्यानंतर अनिकेत तटकरें यांनी जोरदार फलंदाजी करत २१ चेंडूत २४ धावांची फटकेबाजी केली. राष्ट्रवादीकडून काँग्रेसला ६१ धावांचे आव्हान देण्यात आले होते.

काँग्रेसचीही अडखळती सुरुवात झाली. पुरंदरचे धुरंदर आमदार संजय जगताप ३ धावा करुन बाद झाले. धनंजय मुंडेंनी त्यांची विकेट काढली. मात्र, राजकीय मैदानात चचपडणारी काँग्रेस क्रिकेटच्या मैदानातही चचपडताना दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसने ३३ धावांनी विजयी झाली.

Dhananjay Munde, Sangram Thopte, Aniket Tatkare
Cricketnama : शिवसेनेने भाजपला चारली धूळ; मिलिंद नार्वेकरांना उचलून घेत जल्लोष

दरम्यान, राज्याच्या राजकारणात गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेला भाजप-शिवसेनेचा सामना यावेळी क्रिकेटच्या मैदानावरही रंगला. भाजपची (BJP) टीमचे कॅप्टन अहमदनगरचे खासदार सुजय विखे होते. तर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या नेतृत्वात शिवसेना मैदानात उतरली होती. त्यामध्ये शिवसेनेने उत्तम खेळी करत ९ विकेट्सने पहिला सामना जिंकला. शिवसेना भाजपवर भारी पडली. शिवसेनेच्या खेळाडूंनी नार्वेकरांना उचलून घेत जल्लोष केला. खासदार धैर्यशिल माने शिवसेनेच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

Dhananjay Munde, Sangram Thopte, Aniket Tatkare
अखेर संग्राम थोपटे आणि संजय जगतापांची जोडी जमलीच!

धैर्यशिल मानेंनी तुफान फटकेबाजी करत ५ बॉलमध्ये १३ धावा फटकावल्या. त्यानंतर भाजपचे आमदार राम सातपुतें यांनी धैर्यशिल माने यांची विकेट घेतली. मात्र, महापालिकेपासून राजकारणाची सुरुवात करुन दिल्ली गाठण्याचा इरादा करणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांनी पुण्याच्या मैदानावर रोखले. शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर मिलिंद नार्वेकर यांनी मोहोळ यांची विकेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in