रंजन तावरे यांना हे पटतं का? : राष्ट्रवादीचा खडा सवाल

माळेगावात पुन्हा ग्रामपंचायत प्रशासनाची मागणी करणाऱ्या रंजन तावरेंवर राष्ट्रवादीची टीका
रंजन तावरे यांना हे पटतं का? : राष्ट्रवादीचा खडा सवाल
Ranjan TawareSarkarnama

माळेगाव (जि. माळेगाव) : माळेगाव नगरपंचायतीचा विजय असो, असा जयघोष करीत माळेगावकरांसह भारतीय जनता पक्षाचे (BJP) रंजन तावरे आणि त्यांच्या समर्थकांनी डिसेंबर २०२० मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक नाकारल्याची सरकारीपातळीवर नोंद आहे. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचेही फोटो व्हायरल झाले आहेत. असे असताना आता पुन्हा ग्रामपंचायत प्रशासन हवे आहे, असे म्हणणे रंजन तावरे (Ranjan Taware) यांना पटते का. वास्तविक त्यांचा नगरपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पोळी भाजून घेण्याचा खटाटोप आहे. ही माळेगावची जनता जाणून आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते दीपक तावरे यांनी प्रत्युतर दिले. (NCP criticizes Ranjan Taware who demanding Gram Panchayat again in Malegaon)

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आरक्षण सोडतीनुसार सध्या आपापल्या प्रभागात अनेकांनी मतदारांची मते जाणून घेण्यास सुरूवात केली आहे. दुसरीकडे, माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतमध्ये करताना सरकारच्या नगरविकास विभागाने नियमाची पायमल्ली केली, हे कारण पुढे करीत भाजप विचाराच्या माजी सरपंचाने या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळावी; म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दीपक तावरे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपचा दुटप्पीपणा स्पष्ट केला.

Ranjan Taware
अजितदादा त्यावेळी मला म्हणाले होते, ‘हरभजनदेखील मॅच जिंकून देतो!’

तावरे म्हणाले की, बारामती तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीमुळे येथील जनतेच्या विकासाठी दरवर्षी शंभर कोटींपेक्षा अधिकचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावकरांच्या हिताचे प्रयत्न केले आहेत. वास्तविक माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये होताना सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये रंजन तावरेंसह भाजप कार्यकर्त्यांच्या सूचनांचाही आदर केला होता. ग्रामपंचायत निवडणूक नाकारण्याच्या उद्देशाने सर्वपक्षीय जवळपास ७६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज स्वखूशीने मागे घेतल्याची नोंद आहे. असे असताना आता पुन्हा हा दिशाभूल करणारा मुद्दा उपस्थित करून रंजन तावरे माळेगावकरांच्या विकासाच्या आड येत आहेत. त्यांचे पुतणे जयदीप विलास तावरे यांनी न्यायालयात नगरपंचायत प्रशासन नको; म्हणून दाद मागितली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीला आडथळा आणणाऱ्या भाजप कार्यकर्त्याच्या दुटप्पी धोरणाला न्यायालयातच जशास तसे उत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी कार्यकर्तेही सुरू केली आहे.

Ranjan Taware
पंडितअण्णा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात या गोष्टीवरून वाद झाला होता...

माळेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक नाकारण्यासाठी नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला रंजन तावरे व याचिकाकर्ते उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणूकीतून याचिकाकर्त्यांसह सर्वपक्षीय ७६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची सरकारपातळीवर नोंद आहे. ग्रामपंचायत निवडणूक नाकारल्यानंतर नगरपंचायतीचा जयघोष करताना रंजन तावरेंसह याचिकाकर्त्यांचे छायाचित्र व्हायरल झालेले आहे, कोणत्याही ग्रामपंचायतची लोकसंख्या १५ हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा अधिकार सर्वस्वी सरकारचा असतो, नियमानुसार नगरपंचायत अस्तित्वात आली असताना जनतेला व निवडणूक प्रक्रियेला विनाकारण वेठीस धरले जात आहे, अशी टीकाही राष्ट्रवादीने रंजन तावेर यांच्यावर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in