कुत्र्यांच्या नसबंदीतही पैसे खाल्ले : पिंपरी-चिंचवड पालिकेवर आरोपांच्या फैरी

PCMC मध्ये निर्बीजीकरण केलेल्या श्वानाचे छायाचित्र काढणे गरजेचे असताना छायाचित्रे काढली नाहीत.
PCMC
PCMCSarkarnama

पिंपरी : एकही कोरोना (Covid-19) रुग्ण दाखल न झालेल्या म्हणजे एकाही अशा रुग्णावर उपचार न करताही भोसरीतील दोन कोरोना सेंटरचालक संस्थेला साडेतीन कोटी रुपये भाजप (BJP) सत्ताधारी श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) अदा केल्याचा प्रकार यापूर्वीच उघडकीस आला आहे. त्यानंतर आता कोरोना काळातीलच महापालिकेत लाखो रुपयांचा दुसरा घोटाळा (Scam) तो सुद्धा कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेत (निर्बिजीकरण) झाल्याचा खळबळजनक आरोप गुरूवारच्या (ता. १८नोव्हेंबर) पालिका सभेत करण्यात आला. त्यावरून सत्ताधारी नगरसेविकेनेच पक्षाला घरचा आहेर दिला. लॉकाडऊन काळात सर्व काही बंद असताना सात हजार १२५ कुत्र्यांच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केल्याचा दावा पालिकेने केला आहे. एवढेच नाही, तर त्यापोटी ७१ लाख रुपये मोजले आहेत.

PCMC
पवारांविषयी चुकीची कॉमेंट करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला खासदार बापटांनी झापले

अटी-शर्तीनुसार निर्बीजीकरण केलेल्या श्वानाचे छायाचित्र काढणे गरजेचे असताना छायाचित्रे काढली नाहीत. पालिकेने बोगस बिलाच्या आधारावर पैसे दिले, असा आऱोप करीत या भ्रष्टाचारात भाजपचा शहर सरचिटणीस सहभागी असल्याचा गंभीर आरोप आमसभेत विरोधी राष्ट्रवादी काॅंग्रेसने केलाच. पण भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे यांनीही त्यास साथ दिली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने १५ (ता.15 नोव्हेंबर) तारखेला तहकूब झालेली ही सभा गुरुवारी (ता.18 नोव्हेंबर) झाली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. शहरातील भटक्या प्राण्यांसाठी महापालिका आणि मे.पीपल फॉर अॅनिमल यांच्या विद्यमाने प्राणी सुश्रुषा केंद्र व औषधोपचार केंद्र सुरु करण्याचा विषय विषयपत्रिकेवर होता. त्यावर घमासान चर्चा झाली.

PCMC
मावळात भाजपला मोठे खिंडार; जयंत पाटलांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

भाजपने कोरोना काळात भ्रष्टाचार केला. श्वानांच्या निर्बीजीकरणातही पैसे खाल्ले, असा हल्लाबोल माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केला. कोरोना काळात सर्व बंद असताना पालिकेने सात हजार १२५ श्वानांचे निर्बीजीकरण कसे केले, असा प्रश्न त्यांनी विचारला. प्रत्यक्षात ते झालेच नसल्याचे ते म्हणाले. कारण इतक्या क्षमतेने शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्थाच उपलब्ध नाही. ७१ लाख रुपयांच्या या भ्रष्टाचारात शहर भाजपच्या एका सरचिटणीसाचा सहभाग आहे, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला.

या श्वानांचे निर्बीजीकरण झाले का हे पाहण्यासाठी गेले असता मला दीड तास आतमध्ये जाऊ दिले नाही. मी काय चोरी करायला गेली होती का, अशी विचारणा भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली. तर, यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगत त्याच्या सखोल चौकशीची मागणी राष्ट्रवादीचे सदस्य अजित गव्हाणे यांनी केली. तर, लॉकडाऊन काळात सर्व जग बंद असताना पालिकेने साडेसात हजार श्वानांचे निर्बीजीकरण तथा नसबंदी केली? ते करणाऱ्या डॉक्टरांचा पालिकेच्या प्रवेशद्वारावर सत्कारच केला पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी लगावला. तर, हा संशोधनाचाच विषय आहे. या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला पद्मश्री देऊन गौरवले पाहिजे, असे शरसंधान शिवसेनेचे राहूल कलाटे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com