Jayant Patil News: "फौजदाराचा हवालदार झाला; या वाक्यामुळे जयंत पाटील ईडीच्या रडारवर"

Pimpri-Chinchwad : भाजप वॉशिंग मशीन, तर ईडी वॉशिंग पावडर; जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अंमलबजावणी संचालनालय तथा ईडीने आज चौकशी केली. त्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड युवक राष्ट्रवादीने निषेध आंदोलन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून जयंत पाटील यांनी उच्चारलेले 'फौजदाराचा हवालदार झाला' हे वाक्य जिव्हारी लागल्यामुळे ही चौकशी लागल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

भाजप नेत्यांनी राजकीय सूडबुद्धीने जयंत पाटील यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याला त्रास देऊन नाहक बदनाम करण्याचा प्रकार ईडीची पीडा मागे लावून चालवला आहे, असा आरोप पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी यावेळी केला. हे प्रकार थांबले नाहीत तर भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.

Jayant Patil
Sameer Wankhede News: शाहरुख खानशी झालेल्या व्हॉट्सॲप चॅटवरून समीर वानखेडे अडचणीत; एनसीबीने नोंदवला आक्षेप

याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या 'भाजप वॉशिंग मशीन आणि ईडी वॉशिंग पावडर' या प्रात्यक्षिकातून भाजप ही विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा कशाप्रकारे वापर करत आहे, ते दाखवण्यात आले.

गेल्या 9 वर्षात भाजपच्या एकाही आमदार, खासदारांना ईडीची नोटीस आली नाही, याकडे शेख यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना जाणीवपूर्वक सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून त्रास देण्याचे काम हे फॅसिस्ट केंद्र सरकार करीत आहे. त्यांच्या या लोकशाहीविरोधी कारभारास जनता मतदानातून योग्य उत्तर देईल, असे ते म्हणाले.

Jayant Patil
Kannad APMC News : कन्नडच्या सभापतीपदी राठोड, तर बोरसे उपसभापती पदी बिनविरोध..

हे प्रकार थांबले नाहीत तर भाजपच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येतील", असा इशाराही त्यांनी दिला. "ईडी भाजपचा घरगडी" "भाजप हमसे डरती है, ईडी को आगे करती है", "भाजपचा हवालदार काय करतो ईडीच्या नोटीस वाटत फिरतो" "ईडी सरकार हाय हाय", अशी जोरदार घोषणाबाजी या आंदोलनात करण्यात आली. देवेंद्र तायडे, राजन नायर, तानाजी खाडे, युवराज पवार, मीरा कदम, राजेंद्रसिंग वालिया आदी पदाधिकाऱ्यांचीही भाषणे झाली.

(Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com