राष्ट्रवादीचे नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांचे नगरसेवकपद धोक्यात

गेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोंढवा येथील प्रभाग क्रमांक २७ मधून अब्दुल गफूर पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती.
PMC
PMCSarkarnama

पुणे : कोंढवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांचे दगडफोडू जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्दबादल केले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून त्यास तीन महिन्यात पुणे विभागीय जात पडताळणी समितीने या प्रमाणपत्राची फेर पडताळणी करून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

PMC
जगदीश मुळीक म्हणतात; प्रशांत जगतापांना मुळीच गांभीर्याने घेत नाही

गेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोंढवा येथील प्रभाग क्रमांक २७ मधून गफूर पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्यांच्या निवडीला प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवर अनुराधा मदनराव शिंदे, हुसेन खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस. जी. डीगे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने पठाण यांचे १७ जुलै २०१७ रोजी दिलेले जात पडताळणी प्रमाणपत्र रद्दबातल केले.

PMC
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याला तीव्र विरोध : फडणवीस

न्यायालयाने हा निर्णय देताना विभागीय जात पडताळणी समिती, दक्षता पथक ,गफूर पठाण, तत्कालीन जुन्नर प्रांताधिकारी आणि दगडफोडू असल्याचा दाखला देणाऱ्या बेल्हे येथील बेल्हेश्वर मजूर सहकारी संस्थेवर कडक ताशेरे ओढले आहेत. हा निर्णय देताना उच्च न्यायालयाने अनुराधा मदनराव शिंदे यांनी दाखल केलेले सर्व पुरावे ग्राह्य धरून पठाण यांचा संपूर्ण युक्तिवाद फेटाळून लावला.

पठाण यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवताना दगडफोडू मुसलमान असल्याचा दावा केला होता. मात्र हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पठाण यांनी खोटी कागदपत्रे सादर केली. ती न्यायालयात टिकू शकली नाहीत. त्यांचे वडील व चुलते गवंडी तथा दगडफोडू असल्याचा बेल्हे श्वर मजूर सहकारी संस्थेचा जोडलेला १९८५ मधील दाखला हा संगणकावर म्हणजेच ‘फॅब्रिकेटेड’ तयार केला असल्याचा ठपका न्यायालयाने निकालपत्रात ठेवला आहे.

दक्षता पथकाकडून हलगर्जीपणा करण्यात आला तसेच तत्कालीन जुन्नर उपविभागीय अधिकारी पांढरे यांनी अपुऱ्या कागदपत्रांवर जातीचा दाखला दिला असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. या प्रकरणात पठाण यांनी सादर केलेला निकाहनामा देखील बनावट असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. अनुराधा मदनराव शिंदे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पठाण यांनी दाखले मिळवली असून त्यासाठी अधिकारी आणि पडताळणी समितीने संगणमत केले असल्याचे न्यायालयात सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com