भाजप पदाधिका-यांची स्मार्ट सिटी कंपनीतील स्मार्ट वशिलेबाजी उघड!

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांची भाजपचे नामदे ढाके यांच्यावर टीका.
Namden Dhake, Sanjog Waghere
Namden Dhake, Sanjog Wagheresarkarnama

पिंपरी : स्मार्ट सिटीच्या नावाखाली पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) सत्ताधारी भाजप (BJP) ही प्रशासनाला हाताशी धरून भोंगळ कारभार करीत आहे. त्यांची असंख्य उदाहरणे उघड होत असतानाच स्मार्ट सिटी कंपनीच्या जनसंपर्क अधिकारीपदी (पीआरओ) सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके (Namden Dhake) यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाची नियुक्ती झाल्याची बाब समोर आली आहे. कारभारातील गोपनियता, विश्वासार्हता धोक्यात आणणारी ही गंभीर बाब आहे. यामुळे स्मार्ट सिटीतील भाजपचा हस्तक्षेप उघड झाला असून स्मार्ट सिटी कंपनी म्हणावे की "पिंपरी चिंचवड स्मार्ट भाजप कंपनी", असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere) यांनी केला आहे.

Namden Dhake, Sanjog Waghere
आमदार लांडगेंवर आरोप करत दुसऱ्या लांडगेंचा भाजपला रामराम

ही नियुक्ती तातडीने रद्द करण्याची मागणी वाघेरे यांनी पालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ राजेश पाटील यांना पत्र देऊन केली आहे. ‌पालिकेतील सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराची दुर्दशा करून ठेवल्याचे खोदलेल्या रस्त्यांवरून दिसून येत आहे. स्मार्ट सिटीच्या कामांतील भ्रष्टाचार, भाजप नेत्यांचे संबध देखील उघड झालेले आहेत. त्यानंतर स्मार्ट सिटीमध्ये वशिलेबाजी करून आपल्या बगलबच्च्यांची वर्णी लावण्याचे कामही भाजपने सुरू केले आहे. स्मार्ट सिटी कंपनीसाठी जनसंपर्क अधिकारीपदावर ढाके यांच्या निकटवर्तीयाची वर्णी लावण्यात आल्याचे वाघेरे म्हणाले.

Namden Dhake, Sanjog Waghere
पावसातली सभा गाजली पण त्या निवडणुकीच्या मतमोजणीलाही मी गेलो नाही...

ढाके हे स्मार्टसिटी कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या सोबत मागील काही वर्षे त्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणा-या व्यक्तीच्या नेमणुकीतून स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभारात भाजपचा हस्तक्षेप आणि वशिलेबाजी उघड झाली आहे. तशी तक्रार या पदासाठीच्या उमेदवारांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले. पालिका आणि स्मार्ट सिटीच्या कारभारात या प्रकारे सत्ताधारी आणि त्यांच्या पदाधिका-यांशी संबधित व्यक्ती महत्त्वाच्या पदावर काम करणार असतील, तर ही बाब गंभीर आहे, असे ते म्हणाले. यामुळे स्मार्ट सिटी कंपनी प्रशासन चालवत आहे की भाजप? हा प्रश्न निर्माण होतो. कारभारातील गोपनियता आणि विश्वासार्हता धोक्यात येते. याचा गांभीर्याने विचार करून कंपनीचे सीईओ म्हणून पालिका आयुक्तांनी तातडीने ही नियुक्ती रद्द करणे अभिप्रेत आहे. अन्यथा, स्मार्ट सिटी कंपनीत होणा-या हस्तक्षेपाला प्रशासक म्हणून आयुक्त आणि संपूर्ण यंत्रणा देखील जबाबदार आहेत. या पध्दतीने कारभार होणार असल्यास कंपनीचे नाव बदलून ते स्मार्ट भाजप कंपनी करा, अशी आमची मागणी असल्याचे वाघेरे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com