
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भिडे वाड्यासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी बाहेरून गणपतीचे दर्शन घेतले. त्यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खुलासा केला आहे. शरद पवार यांनी नॉनव्हेज खाल्ले असल्याने मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेतल्याचे जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. (Sharad Pawar Latest Marathi News)
दगडूशेठ मंदिराशेजारील गृह विभागाची जागा मंदिर ट्रस्टला देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी शरद पवारांसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी शुक्रवारी मंदिराची पाहणी केली. यावेळी भिडे वाड्यालाही त्यांनी भेट दिली. ते दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, मंदिरात न जाता त्यांनी बाहेरूनच गणपतीचे दर्शन घेतले. (NCP Sharad Pawar visit Dagdusheth Halwai Ganpati Temple)
त्यावर चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सांगितले की, पवारसाहेबांना माझ्यासह इतरांनी विचारले की, साहेब आपण मंदिरात दर्शन करावं. त्यावर 'मी आज नॉनव्हेज खाल्ले असल्यामुळे मी चुकीचा पायंडा पाडणार नाही. माझ्या बुध्दीला ते पटणार नाही,' असं शरद पवार म्हणाल्याची माहिती जगताप यांनी दिली.
मंदिराच्या व्यवस्थापन ट्रस्टचा मान राखून शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील भेटीसाठी येणार होते. त्याप्रमाणे ते आले. त्यांच्यासोबतच आम्ही होतो. पुणेकरांच्या आस्थेचं हे प्रतिक आहे. सर्वांची गणपतीवर श्रध्दा आहे. आल्यानंतर त्यांनी जागेची पाहणी केली आणि पुढील कार्यक्रम असल्याने लगेच मार्गस्थ झाले. बाहेरून दर्शन घेऊन पवारसाहेब गेल्याचे जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार हे नास्तिक असल्याची टीका काही दिवसांपूर्वी केली होती. ते कधीच मंदिरात जात नाही, असंही ठाकरे म्हणाले होते. त्याला पवारांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. आपण आपल्या श्रध्देचं कधी अवडंबर करत नाही. निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात कन्हेरी येथील मंदिरात नारळ वाढवूनच करत असल्याचेही पवारांनी स्पष्ट केलं होतं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.