स्वतः पवारांनी पाठवले 'ईद मिलन'ला येण्याचे निमंत्रण

सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी उचलले पाऊल
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी आता पाऊल उचलले आहे. राष्ट्रवादीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले असून, खुद्द शरद पवार याचे निमंत्रक आहेत. आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये एकात्मता जपत सामाजिक समता, बंधुता अबाधित राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

देशातील बदलत्या सामाजिक परिस्थितीला काही मूठभर समाजविघातक प्रवृत्ती कारणीभूत आहेत. या सर्व गोष्टींना विरोध करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. येथील सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर कोविड काळापूर्वी दरवर्षी घेण्यात येणारा "ईद मिलन" कार्यक्रम या वर्षी मोठ्या उत्साहात घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्व धर्मियांचे धर्मगुरू, सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रक स्वतः शरद पवार आहेत, असे राष्ट्रवादीनं म्हटलं आहे.

Sharad Pawar
कोरोना नव्हे तर लॉकडाउनची धास्ती! चीनमधील जनता अखेर हतबल

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवत गेल्या ६० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आदरणीय शरद पवारांनी नेहमी सर्वधर्मीय अठरा पगड जातींच्या सर्व घटकांना सोबत घेत महाराष्ट्राचा विकास केला. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, पुणे शहरात हिंदू मुस्लिम बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असूनही सर्वधर्मीय गुण्या गोविंदाने राहतात. याचे कारण येथील सलोखा जपण्यासाठी घेतले जाणारे सर्वधर्मीय कार्यक्रम. शरद पवारही दरवर्षी पुणे शहरात 'ईद मिलन ' सारखा कार्यक्रम राबवतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे बंद असणारा हा कार्यक्रम यावर्षी राज्य कोविड निर्बंधमुक्त झाल्याने मोठ्या उत्साहात घेण्यात येणार आहे, असे पक्षानं सांगितलं आहे.

Sharad Pawar
श्रीलंकेत आगडोंब! हिंसाचारानंतर माजी पंतप्रधान कुटुंबीयांसह नौदल तळावर लपले

या कार्यक्रमादरम्यान सर्व नागरिकांसाठी शिरखूर्मा व स्नेहभोजन व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतर होणाऱ्या मुशायरा व कवी संमेलन या कार्यक्रमासाठी सम्पत सरल,अल्ताफ़ ज़िया,कुनाल दानिश ,अनवर कमाल बेहरीन,डॉ आरिफ़ा शबनम,राना तबस्सुम,मन्नान फ़राज़ आदी नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम गुरूवारी (ता.१२) कोंढवा खुर्द येथील एन.आय.बी.एम रोडवरील,लोणकर गार्डन येथे सायंकाळी ६.०० वाजता संपन्न होणार असून सर्व धर्मीय पुणेकरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीनं दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com