राजकारण तापलेलं असताना शरद पवार अन् फडणवीस एकाच व्यासपीठावर!

महाविकास आघाडी विरूध्द भाजप आणि मनसे असं चित्र निर्माण झालं असून दररोज या पक्षांचे नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत.
Sharad Pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Devendra FadnavisSarkarnama

पुणे : हनुमान चालिसा, जेम्स लेनचं पुस्तक या मुद्यांवरून राज्यातील राजकारण सध्या तापलं आहे. महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) विरूध्द भाजप (BJP) आणि मनसे (MNS) असं चित्र निर्माण झालं असून दररोज या पक्षांचे नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. कोल्हापूरात शनिवारी झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला लक्ष्य केलं. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही दिवसांपूर्वी सलग 14 ट्विट करत पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते रविवारी पुण्यात एकाच व्यासपीठावर आले होते.

शरद पवार आणि फडणवीस हे दोन्ही नेते अनेक महिन्यांनंतर 'सकाळ' च्या व्यासपीठावर रविवारी एकत्र आले. 'सकाळ'ने पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राज्यातील उद्योग-व्यावसायिकांचा 'ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र' या कार्यक्रमातंर्गत गौरव केला. यावेळी पवार, फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार हेही यावेळी उपस्थित होते.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
परवानगी मिळो न मिळो राज ठाकरे सभा घेणारच; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं...

कार्यक्रमाच्या ठिकाणी पवार आणि शिंदे यांच्यानंतर फडणवीस दाखल झाले. उपस्थितांना अभिवादन करून फडणवीस हे पवार यांच्याशेजारी बसले. राज्यातील राजकारण तापलेलं असताना हे दोन्ही नेते योगायोगाने 'सकाळ'च्या कार्यक्रमात एकत्र आले. यावेळी दोघे काहीवेळा बोलतानाही दिसून आले. फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पवारांना लक्ष्य करत एकामागोमाग 14 ट्विट केले होते.

त्यावर उत्तर देताना पवारांनी आपण त्याचा आनंद घेतो असं उत्तर पवारांनी दिलं होतं. सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) व मोहित कंबोज यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
मोठी घडामोड : राणा दांपत्याला रातोरात पोलिसांनी दुसरीकडं हलवलं

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती असल्याचा दावाही भाजपकडून केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारकडून पोलिसांचा गैरवापर करून भाजप नेत्यांना त्रास दिला जात आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. मनसुख हिरेन प्रमाणे आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तर कंबोज यांनीही असाच दावा केला आहे. यापार्श्वभूमीवर पवार आणि फडणवीस रविवारी एकाच व्यासपीठआवर आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com