जयंत पाटलांच्या मनात अजूनही रमेशआप्पांच्या पराभवाची आठवण, म्हणाले...

Jayant Patil | NCP | Ramesh Thorat | : रमेश थोरात यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चांगलाच जिव्हारी
Jayant Patil - Ramesh Thorat
Jayant Patil - Ramesh Thorat Sarkarnama

दौंड : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दौंडचे माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांचा ७४६ मतांनी निसटता पराभव झाला व त्याची सल आजदेखील आहे. निवडून येण्याची शंभर टक्के परिस्थिती होती. मात्र तेव्हा विजयश्री खेचून आणण्यात आपण कमी पडलो, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली. ते दौंड (Daund) तालुक्यातील सोनवडी येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह रमेश थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदी नेते उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील बोलताना म्हणाले, "अडिच वर्षे सत्तेत असताना पक्ष कार्यकर्त्यांच्या सरकार आणि पक्षाकडून काय अपेक्षा आहे, हे जाणून घेत चर्चा करण्यासाठी संवाद यात्रा आहे. कार्यकर्त्यांचे ऐकण्यासाठी आम्ही यात्रेत कमी बोलणार आहोत. पक्षावर प्रेम करणारे आणि पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना एकत्रित आणण्याची आवश्यकता आहे. दौंड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या कामांना गती देण्याचे काम झाले आहे, असेही ते म्हणाले.

Jayant Patil - Ramesh Thorat
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सर्वात मोठा खुलासा; वानखेडेंची संपूर्ण कारवाईच संशयास्पद

कितीही गोंधळ घाला, मलिकांचा राजीनामा घेणार नाही : जयंत पाटील

याशिवाय विरोधकांना किती गोंधळ घालायचा तेवढा घालू देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो असेही जयंत पाटील यांनी आज ठणकावून सांगितले. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा इरादा स्पष्ट केला.

Jayant Patil - Ramesh Thorat
नवाब मलिकांनी वानखेडेंवर केलेले आरोप योग्य; कारवाईसाठी अद्याप मुहूर्त का नाही?

तसेच नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप भाजप करत राजीनाम्याची मागणी करत आहेत. खोटे - नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे असा टोलाही त्यांनी लगावला. नवाब मलिक यांच्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com