Ajit Pawar : बारामतीतील लोकांना माहिती आहे, कुठले बटन दाबायचे ; अजितदादांचा भाजपला टोला

Ajit Pawar : "बारामतीत किती जण आले, किती जण गेले, खूप लाटा मी बारामतीत पाहिल्या आहेत.
NCP Leader Ajit Pawar
NCP Leader Ajit Pawarsarkarnama

पुणे : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यनगरी (pune) सज्ज झाली असून यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासक विक्रम कुमार यांच्या हस्ते गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. विसर्जन मिरवणूकीस सुरुवात झाली आहे. (Ajit Pawar latest news)

गणेश विसर्जन मिरवणुकीत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांना काळजी घेण्याचे आवाहन केले. "सगळ्या गणेश भक्तांनी काळजी घ्यावी की कुठला ही अनुचित प्रकार घडू नये. पोलिस त्यांचे काम करतीलच पण गणेश मंडळांनी देखील काळजी घ्यायला हवी," असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, "३१ तारखेला बाप्पा आपल्याकडे आले आजपर्यंत सगळे कार्यक्रम चांगले पार पडले आहेत. आज दोन वर्षांनतर विसर्जन मिरवणूक निघते आहे. अतिशय आनंदाने उत्साहाने हा उत्सव पार पडला आहे,"

गणेशोत्सवात बारामती मतदार संघात अनेक भाजपच्या नेत्यांनी भेटी दिल्या. यावरुन अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "बारामतीत किती जण आले, किती जण गेले, खूप लाटा मी बारामतीत पाहिल्या आहेत. बारामती मधल्या लोकांना माहिती आहे की कुठले बटन दाबायचे,"

NCP Leader Ajit Pawar
Prince Charles आता चार्ल्स तिसरे म्हणून ओळखले जाणार ; 70 वर्षांनंतर राष्ट्रगीत बदलणार

दोन दिवसापूर्वी पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होता. यावेळी ते उशिरा आले होते, हाच धागा पकडून अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे आणि माध्यमांना टोला लगावला. अजित पवार म्हणाले, "एकनाथ शिंदे परवा पुण्यात आले तेव्हा उशिरा आले, मला, तुम्ही लवकर आलात असा प्रश्न विचारला असता, आमचा वेळ महत्त्वाचा असतो तसा बाकीच्यांना पण वेळ महत्त्वाचा असतो,"

वाहतुकीत मोठा बदल

गणेश विसर्जनामुळे शुक्रवारी पुण्यात पीएमपीच्या वाहतुकीत मोठा बदल केला आहे. मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या सर्व बस रद्द केल्या आहेत. मात्र उपनगरांत सुमारे ११०० बस धावतील.

प्रवाशांची कमीत कमी गैरसोय व्हावी या करिता पीएमपी प्रशासन प्रयत्न करणार आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार हा बदल केला जात आहे. स्वारगेट-हडपसर, कात्रज-हडपसर अशा उपनगरांत धावणाऱ्या बस मात्र धावणार आहेत. त्यामुळे उपनगरांतील प्रवाशांची सोय होणार आहे. स्वारगेट-शिवाजीनगर, कात्रज-विद्यापीठ, भक्ती शक्ती अशा मध्यवर्ती भागांतून जाणाऱ्या बस रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळ व दुपारच्या दोन्ही सत्रांत मिळून सुमारे ५३८ बस रद्द केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com