Ajit Pawar : मध्यावधी निवडणुकाबाबत अजितदादा म्हणाले, "लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र.."

Ajit pawar on Assembly Elections News : विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होतील, असे ते म्हणाले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit pawar on Loksabha and Assembly Elections News : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं भाष्य केलं होतं. त्यावर काल (शुक्रवारी) दिवसभर राजकीय चर्चा रंगल्या. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही मध्यावधी निवडणुका होतील, असे सांगितले.

या चर्चेनंतर राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात मध्यावर्दी निवडणुका होतील का या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी याबाबत सांगितले. राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होतील असे ते म्हणाले.

अजित पवार म्हणाले, "लोकसभेच्या बरोबर मध्यावधी विधानसभेची निवडणूक घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी १९९९ साली अशा प्रकारे निवडणूक झाली होती. या काळात सहा महिने बाकी असताना निवडणुका घेतल्या आणि लोकांनी लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्र मतदान केलं होतं,"

Ajit Pawar
ACB Pune : मोदीबागेत बडा मासा जाळ्यात ; 'जलसंपदा'अधिकारी रिटायर होण्याआधीच..

एकूण परिस्थिती पाहता पक्षांनी आढावा घेण्याचं काम सुरु आहे. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मध्यावधी निवडणुकीबाबत भाकीत केले होते.

ते म्हणाले होते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा,” असा संदेश शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत दिला होता.पवार यांनी राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार यावर भाष्य केले होते. तेव्हा त्यांनी मध्यावधी निवडणुका होतील असं म्हटलं आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही. अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल; पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल. त्यातून एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते,” असे भाकीत शरद पवार यांनी यापूर्वी वर्तवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in