राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचं 'धोतर फेडो' आंदोलन

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा वाद दिवसेंदिवस आणखीच चिघळत चालला आहे.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा वाद दिवसेंदिवस आणखीच चिघळत चालला आहे. विरोधी पक्ष शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मराठा संघटना राज्यपालांविरूद्ध आक्रमक झाले असून राज्यपालांना दिल्लीला बोलवून घ्या अशी मागणी करण्यात येत आहे. तर, माफी मागा नाहीतर स्वत:लाच जोडे मारुन घ्या, असा इशाराच ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पुण्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एका तरुणाने कोश्यारी यांची वेषभुषा परिधान केली होती. त्याच्याभोवती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोश्यारी यांच्या यविरोधात घोषणाबाजी करत होते. कोश्यारी हाय हाय, राज्यपाल चले जाव, काळी टोपी हटवा, महाराष्ट्र बचाव अशी घोषणाबाजी करण्याात आली. याचवेळी आंदोलनकर्त्यांनी त्या डमी राज्यपालाचे धोतर फेडत कोश्यारींविरोधात देण्यात आल्या.

Bhagat Singh Koshyari
राज्यपाल कोश्यारींचे वक्तव्य; 'शिवाजी महाराज तो पुराने जमाने के...आज गडकरी है...'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमामध्ये बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी, 'शिवाजी महाराज तो पुराने जमाने की बात है, अभी तुम्हारे सामने गडकरी जैसे आदर्श है., असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यपाल म्हणाले, मला असं वाटतं, जर कोणी विचारलं तुमचे आदर्श कोण आहेत, तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळतील. शिवाजी तर जुने झाले, मी नवीनांबद्दल बोलतोय. आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत इथेच मिळतील, असे ते म्हणाले.

तेव्हापासून राज्यपालांच्या विरोधात राज्यभर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील कोश्यारी यांच्याविरोधात आक्षेप नोंदवला आहे. मात्र भाजपकडून त्यांची पाठराख केली जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यपालांनी हे विधान कोणत्या संदर्भाने केले हे आपल्याला माहित नाही, तर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यपालांना तसे म्हणायचे नसेल, असे म्हणत सारवासारव केली. तर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील कोश्यारी यांच्या मनात दुसरे कोणते भाव नसल्याचं म्हणत त्यांची पाठराखण केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com