Chinchwad-Kasaba By Election News : चिंचवड राष्ट्रवादी लढणार, कसब्यावरही दावा

भारतीय जनता पक्ष या दोन्ही ठिकाणी कोणता उमेदवार देईल, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
Chinchwad-Kasaba By Election News
Chinchwad-Kasaba By Election News

प्राची कुलकर्णी

Chinchwad-Kasaba By Election News : 'चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. या मतदारसंघातल्या बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ही पोट निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आहे. त्यांच्या आग्रहाखातरच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. या संदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.' असं विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज सांगितलं. मांजरीत आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. कसबा विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाची सर्वाधिक ताकद आहे त्या पक्षाला ती जागा मिळावी, अशी आमची भूमिका आहे. महाविकास आघाडीत कसबा विधानसभा मतदार संघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे. त्या जागेवर काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे. पण याच माध्यमातून कसबा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक ताकद असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत पवार यांनी कसबा विधानसभा मतदारसंघावर देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा सांगितला आहे.

Chinchwad-Kasaba By Election News
Parbhani Politics : अखेर ती शंका खरी ठरली: परभणीत शिंदे गटाचा पुन्हा विरोधांना झटका

त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष या दोन्ही ठिकाणी कोणता उमेदवार देईल, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक यांचे निधन झालं. तर ३ जानेवारी रोजी चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचंही निधन झालं. या दोघांच्या निधनाला एक महिना पूर्ण होण्याच्या आतच केंद्रीय निवडणूक आयोगाने या दोन्ही मतदारसंघासाठी पोटनिवडणुक जाहीर केली. त्यामुळे या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे.

येत्या काही दिवसात सर्वच पक्षाचे उमेदवार जाहीर होतील. कसब्यातून आणि चिंचवड मतदार संघातून दिवंगत आमदारांच्या घरातूनच उमेदवारी पक्षाकडून दिली जाण्याची शक्यता आहे. पण सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. पण अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता निवडणूक होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com