दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादीचा फायनलमध्ये प्रवेश; जगतापांची रणनीती अन् तटकरेंची फटकेबाजी

अंतिम फेरीत शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सामना रंगणार आहे.
दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादीचा फायनलमध्ये प्रवेश; जगतापांची रणनीती अन् तटकरेंची फटकेबाजी

पुणे : अवघ्या राजकीय आणि क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेल्या सरकारनामाच्या सेमिफायनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिस (Police) अधिकाऱ्यांच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. आपल्या ३५ धावांपर्यंत जाण्याआधीच राष्ट्रवादीने डावपेच आखून पोलिसांच्या टीमला गारद केले आणि फायनलमध्ये जाण्याआधीच राष्ट्रवादीने विजय उत्सव मैदानावरच रंगवला. राष्ट्रवादीच्या या विजयाने अंतिम फेरीत शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सामना रंगणार आहे.

सरकारनामाची ट्रफी जिंकण्यासाठी सेमीफायनलकडे साऱ्यांच्या नजरा होत्या. राष्ट्रवादी आणि पोलिस या दोन्ही संघामध्ये ताकदवान खेळाडू होते. राष्ट्रवादीने पहिली फलंदाजी केली. यामध्ये त्यांनी ३५ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वात उतरलेल्या राष्ट्रवादीच्या टीमने विजय मिळवला. राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवला.

दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादीचा फायनलमध्ये प्रवेश; जगतापांची रणनीती अन् तटकरेंची फटकेबाजी
Cricketnama : सचिन अहिरांच्या नेतृत्वात शिवसेनेचा दणदणीत विजय; मनसेला नमवत फायनलमध्ये प्रवेश

पोलिस प्रशासनाच्या संघाने जोरदार गोलंदाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसला ३५ धावांवर रोखले. त्यामुळे राष्ट्रवादीला सहज पराभूत करु असा विश्वास घेऊन मैदानात उतरलेल्या पोलिस प्रशासनाच्या संघाची सुरुवात मात्र, अडखळत झाली. राष्ट्रवादीने आक्रमफ शेत्ररक्षण करत पोलिस संघाला शेवटपर्यंत झुंजायला लावले. एकामागे एक विकेट पडल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या संघ अडचणीत आला.

दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादीचा फायनलमध्ये प्रवेश; जगतापांची रणनीती अन् तटकरेंची फटकेबाजी
Cricketnama : शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने; कोण कोणाला पाणी पाजणार?

राष्ट्रवादीच्या संघाचे कर्णधार प्रशांत जगताप यांनी रणनिती करत क्षेत्ररक्षण केले. त्यामुळे अटीतटीच्या सामन्यात राष्ट्रवादीने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. पोलिस प्रशासनाकडून तेगबिरसिंग संधू आणि उल्हास कदम मैदानात उतरले होते. त्यामध्ये सागर बालवडकर यांनी अप्रतिम झेल घेत तेगबिर यांची विकेट घेतली. त्यांनी १३ धावा केल्या. त्यामुळे आता फायनमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना रंगणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com