Har ghar Tiranga: पिंपरी-चिंचवडमध्ये तीन लाख घरांवर फडकणार तिरंगा

Pimpri-chinchwad news| स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशभरात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत “हर घर तिरंगा” उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Pimpri-chinchwad news|
Pimpri-chinchwad news|

पिंपरी : यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी घर घर तिरंगा ही मोहीम देशभर राबविली जाणार आहे.त्यामुळे राष्ट्रध्वजाला अभूतपुर्व मागणी वाढली आहे.परिणामी आतापर्यंत फक्त सुती कपड्यातच फडकावला जाणारा तिरंगा (National Flag) यावेळी रेशीमसह रोटोमध्येही फडकवला जाणार आहे. सुती कपड्यांत मागणी पूर्ण होणे शक्य नसल्याने सर्व प्रकारच्या कापडातील तिरंग्याला यावर्षी परवानगी देण्यात आली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभरात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत “हर घर तिरंगा” उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड पालिकेचा ठसा देश पातळीवर उमटविण्यासाठी शहरातील ३ लाख घरांवर तिरंगा फडकविण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.त्याच्या तयारीसाठी त्यांनी सर्व विभागप्रमुख व क्षेत्रिय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, सहशहर अभियंता सतिष इंगळे, संजय कुलकर्णी,प्रमोद ओंबासे, उपायुक्त रविकिरण घोडके, सहायक आयुक्त नीलेश देशमुख उपस्थित होते.

Pimpri-chinchwad news|
मुख्यमंत्र्यांच्या गाडीवरच हल्ला करण्याचा होता कट..! शिवतारेंचा गौप्यस्फोट

महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयात तिरंगा झेंडा वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे तो आजपासून उपलब्ध होणार आहे.त्यासाठी २४ रुपये शुल्क आहे.वीस बाय तीस इंच आकारात तो आहे. पालिकेला राज्य सरकारकडून एक लाख तिरंगा ध्वज (रोटोतील) मिळणार आहेत.तो प्रत्येकी वीस रुपयांना दिला जाणार आहे.तीन लाख रेशीम तलम तिरंग्यासाठी पालिकेने टेंडरच काढले आहे. आजपासून (ता.३)हे दोन्ही ध्वज विक्रीसाठी उपलब्ध होतील,असे पालिकेच्या भांडार विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांनी सरकारनामाला सांगितले.

महापालिकेची शक्कल

तीन लाख घरांवर तिरंगा फडकावण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पिंपरी पालिकेने शक्कल लढवली आहे.त्यासाठी त्यांनी एक योजना जाहीर केली आहे. २० जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान संपूर्ण मिळकतकराचा भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना तिरंगा मोफत देण्यात येणार आहे.म्हणजे हजार ते लाख रुपयांपर्यंतचा मालमत्ताकर भरणाऱ्यांना २४ रुपयांचा तिरंगा मोफत दिला जाणार आहे.हा प्रकार म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा असल्याने त्याची चर्चा आहे. शहरात सहा लाखांवर मिळकतधारक असून त्यापैकी गेल्या १५ दिवसांत सात हजारजणांनी कर भरून मोफत तिरंगा योजनेचा लाभ घेतला आहे.१५ तारखेपर्यंत जे मिळकतधारक हा कर भरतील,त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल,असे पालिकेच्या करनिर्धारण व करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com