फडणवीसांच्या काळात मराठा समाजाची कामे झाली; ठाकरे सरकार मात्र...

अण्णासाहेब महामंडळाचा कारभार ही ठप्प आहे.
Narendra Patil
Narendra Patilsarkarnama

पुणे : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये दोन वर्षात मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठाकरे सरकारने माफी मागवी आणि पुन्हा आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी भाजप नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केली. (Narendra Patil criticizes Thackeray government)

Narendra Patil
एसटी संपात शिवसेनेचा मराठी बाणा गेला कुठे ?

नरेंद्र पाटील पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, महविकास आघाडी मराठा आरक्षण विषय विसरला आहे, अशी स्थिती आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने उच्च न्यायालयात आरक्षण टिकवले. भाजप युतीने २०१८ ला कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरीत व शिक्षणात आरक्षण दिले होते. ठाकरे सरकारेने सारथी संस्थेचे महत्त्व कमी केले आणि योजनांना कात्री लावली, असा आरोप त्यांनी केला.

त्याच बरोबर अण्णासाहेब महामंडळाचा कारभार ही ठप्प आहे. अधिवेशन होत नाही. प्रश्न उत्तर होत नाही, असेही पाटील म्हणाले. मराठा समजाची चांगली कामे फडणवीस सरकारच्या काळात झाली तशी कामे पुढे झाली नाहीत, असा गंभीर आरोप पाटील यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा समाजासाठी काम करत नाहीत, असेही पाटील म्हणाले.

Narendra Patil
महाविकास आघाडीचा कारभार म्हणजे ‘फसवणुकीची दोन वर्षे’

या वेळी पाटील यांनी काँग्रेस नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. पाटील म्हणाले, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना व आत्ता मंत्री असताना देखील समजला न्याय मिळाला नाही. अजित पवार यांना १०० कोटी देता येत नाहीत. महविकास आघाडी हे ढोंगी सरकार, असल्याचा हल्ला बोल पाटील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com