Narendra Modi News : मोदींच्या मुंबई दौऱ्यावरचा खर्च भाजपकडून वसूल करा : काँग्रेस नेत्याची मागणी!

Narendra Modi News : जनतेच्या तिजोरीतून मोदींच्या दौऱ्यावर खर्च झाले आहे.
Narendra Modi News :
Narendra Modi News :Sarkarnama

Narendra Modi News : मुंबईच्या दौऱ्यावर नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामाचं लोकार्पण करण्यात आले. यानंतर मोदींची बीकेसी मैदानात सभा पार पडली. मोदींचा हा दौरा बडेजावामुळे चर्चेत आला. या निमित्ताने मोदींच्या दौऱ्यावरचा खर्चाचा मुद्द्यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसकडून याच मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले जाते आहे.

Narendra Modi News :
BBC Documentry : मोठी बातमी! BBC ची डाॅक्युमेंट्री ब्लॉक, प्रोपागेंडा असल्याचा सरकाचा दावा!

नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे पुण्यातले नेते व प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी हा आक्षेप घेत दौऱ्यावरच्या खर्चाला विरोध केला आहे. "सरकारी तिजोरीतून मोदींच्या दौऱ्यावर झालेला खर्च भाजपकडून वसूल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने केंद्राला द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

Narendra Modi News :
Dombivali News : ठाकरे गटाच्या कार्यक्रमात पालिका आयुक्तांचा खोडा : अखेर न्यायालयात बाजी जिंकली!

तिवारी पुढे म्हणाले, "मुंबईमध्ये सरकारी खर्चाने होणाऱ्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी केवळ स्वपक्षाच्या प्रचाराचे ढोल बडवण्यात आले. विकासाच्या वास्तवतेपेक्षा सतत राजकीय हेतूनेच बोलणे, हे पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करणारे आहे."

"राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली तरच विकास होईल, असे वक्तव्य करणे हे जनतेस धमकावण्यासारखे आहे. घटनात्मक पंतप्रधान पदावरील व्यक्तिने पक्षीय भूमिकेत राहून भेदभाव करणे योग्य नाही," अशी ही टीका तिवारी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com