Narayan rane Replied Ajit Pawar : अजित पवारांची टीका राणेंच्या जिव्हारी; म्हणाले, पुण्यात येऊन बारा वाजवीन...

दोन दिवसांपू्र्वी अजित पवार एका सभेला संबोधित करताना त्यांनी नारायण राणेंवर टीका केली होती.
Narayan rane Replied Ajit Pawar
Narayan rane Replied Ajit PawarSarkarnama

Narayan rane Replied Ajit Pawar : 'शिवसेनेतून बाहेर पडताच नारायण राणेंना एका बाईनं पाडलं… बाईनं' अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. ही टीका राणेंच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. अजित पवारांच्या या टीकेवर आता थेट नारायण राणेंनी उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी सपत्नीक करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत निशाणा साधला.

''माझ्या फंद्यात पडू नका नाहीतर पुण्याला येऊन 12 वाजवीन, अशा शब्दांत नारायण राणे यांनी अजित पवारांना उत्तर दिले आहे. त्यामुळे आता अजित पवार- नारायण राणे वादाला तोंड फुटले आहे. नारायण राणे काल (२५ फेब्रुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर होते. '' बारामतीच्या बाहेर जाऊन बारसे घालणं बंद करा. असं म्हणत अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं मला माहीत नाही. पण माझ्या फंद्यात पडू नका, नाहीतर पुण्याला येऊन 12 वाजवीन, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे.

Narayan rane Replied Ajit Pawar
Chinchwad By-Elelction: पहिल्या टप्प्यात चिंचवडमध्ये ३.५२ तर कसब्यात ६.०५ टक्के मतदान

मुंबई माझे कार्यक्षेत्र आहे. दिवंगत बाळासाहेबांनी मला कोकणात पाठवलं. तिथेही मी सहा वेळा निवडून आलो. त्यानंतर मला तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून मी वांद्र्यात उभा राहिलो. तिथे मी पडलो. मात्र महिला असो किंवा पुरुष उमेदवार हा उमेदवारच असतो, असे म्हणत नारायण राणेंनी अजित पवारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

दोन दिवसांपू्र्वी अजित पवार एका सभेला संबोधित करताना त्यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. म्हणाले होती. '' नारायण राणेंनी शिवसेना फोडली. त्यांच्यासोबत गेलेले सगळे पडले की नाही, नारायण राणे तर दोनदा पडले, एकदा कोकणात पडले आणि दुसऱ्यांदा वांद्र्यात.. तिथेही उभे होते. तिथे तर एका महिलेने पाडले. बाईने पाडलं बाईने... असे म्हणत अजित पवार यांनी राणेंच्या जखमेवर मीठ चोळलं.

आज प्रत्येकाची काय परिस्थिती आहे शिवसेनेतून आत्तापर्यंत शिवसेना फोडणाऱ्यांचा विजय झालेला नाही. त्यांना जनतेने जागा दाखवली. भुजबळांसहीत सगळ्यांना पाडण्याचे काम केले. त्यानंतर अजित पवार यांच्या या टीकेनंतर भलतेच खूश झालेल्या संजय राऊत यांनी अजित पवारांचे तोंडभरून कौतुक केलं. दादा म्हणजे कमाल की चीज आहेत, असे ट्विट करत म्हणत संजय राऊत यांनी आपला आनंद व्यक्त केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com