नारायण राणेदेखील मुख्यमंत्री होते त्यांनी का नाही दिलं आरक्षण

आरक्षणासंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय हे राणे यांना समजत नाही का ?
sar58.jpg
sar58.jpg

पुणे : शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होते त्यांनी आरक्षण दिलं नाही अशी टीका करणारे नारायण राणेदेखील मुख्यमंत्री होते. त्यांनी का नाही दिलं आरक्षण असा प्रश्‍न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला.आरक्षणासंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे हे राणे यांना समजत नाही का असा संतप्त सवाल पवार यांनी केला.(Narayan Rane was also the Chief Minister. Why didn't he give reservation?) 

नारायण राणे यांनी आरक्षणाच्या विषयावरून गुरूवारी पुण्यात बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राणे यांच्या टीकेला पवार यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘ नारायण राणे मुख्यमंत्री होते. आरक्षणसंदर्भातील समितीचे काम आमच्या सरकारनेच त्यांच्याकडे दिले होते. आता दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याची कल्पना राणे यांना नाही का ? एका बाजूला पवार साहेंबाबद्दल आदर बाळगायचा. अगदी त्यांच्या पायाचे दर्शन घ्यायचे आणि मागून अशी बदनामी करायची हे योग्य नाही. गेल्या पन्नास वर्षांच्या राजकारणात पवार यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली आहे. टीका करणाऱ्यांनी याचे भान ठेवावे.’’

पुण्यात आणखी सवलतीचा निर्णय सोमवारी
पुणे व पिंपरीतील कोरोनाची स्थिती चांगली सुधारली आहे. त्यामुळे पुण्यातील सलून व पार्लर तसेच इतर व्यवसायांना आणखी काही सवलती देता येतील का याबाबतचा निर्णय सोमवारी घेण्यात येईल, असे पवार यांनी यावेळी सांगितले. रोजच्या स्थितीची आढावा रोज घेण्यात येत आहे. सोमवारपर्यंत अंदाज घेऊन योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.ग्रामीण भागात अजून सुधारणा होत आहे. खडकी व पुणे कॅन्टोन्मेन्ट हे युनिट म्हणून पुण्यात ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे पवार यांनी सांगितले.

राजगुरूनगरचा वाद स्थानिक
राजगुरूनगरमधील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तिथे पेटला आहे. मात्र, आम्ही सत्तेत एकत्र आहोत. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले आहे. शिवसेनेने त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगावे. मार्ग निघेल, असे पवार यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि राष्ट्रवादी असा थेट सामना विधानसभेला झाला होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर संघर्ष आहे. मात्र, राज्य पातळीवर आम्ही एकत्र आहोत. तालुक्यताच्या पातळीवर त्यांच्यातही एकोपा होईल, असे पवार यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com