मेट्रो स्थानकाच्या फलाटावर नारायण राणेंनी केला योगा

आमदारांवर अंकुश नसल्याने कॉंग्रेस पराभव झाला.
मेट्रो स्थानकाच्या फलाटावर नारायण राणेंनी केला योगा
Narayan Rane Latest NewsSarkarnama

पिंपरी : विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी काल झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे (Congress) उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव होऊन भाजपचे (BJP) प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या विजयाचा चमत्कार झाला. त्यावर आमदारांवर अंकुश नसल्याने कॉंग्रेस पराभूत झाल्याची प्रतिक्रिया भाजपचे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये दिली. राज्यासह देशातही कॉंग्रेसचं राहिलंय काय अशी विचारणा करीत ती संपत चालली असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस व त्यांचे नेते कामच करीत नसल्याची टीकाही त्यांनी केली. (Narayan Rane Latest Marathi News)

Narayan Rane Latest News
नवनीत राणांनी पुन्हा वाचली हनुमान चालिसा अन् म्हणाल्या, उद्धव ठाकरेंची उलटी गणती सुरू

आंतरराष्ट्रीय योगदिन राणे यांनी आज सकाळी फुगेवाडी मेट्रो स्थानकात साजरा केला. देशातील नागरिकांना योगाचे महत्व व त्याचे लाभ सांगणे, या उद्देशाने योग दिन महत्वाचा आहे. आत्मनिर्भर होत असताना प्रत्येक नागरिक निरोगी व्हावा, हे गरजेचे आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मेट्रो स्थानकावर योगदिन साजरा होणे व फलाटावर योग सराव करणे, हे विशेष आहे. त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या स्थानकावर योग करताना नागरिकांना पाहणे, याचा आनंद आहे, असे ते म्हणाले.

Narayan Rane Latest News
ॲट्रॉसिटी गुन्ह्याअंतर्गत करुणा शर्मांना अटक

या स्थानकावर आयोजित योग उत्सव व योग चित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांनी यावेळी केले. प्रदर्शन तीन दिवस विनामूल्य पाहण्यास उपलब्ध आहे. योगोत्सवात सहभागी झालेल्या एक हजार जणांना फुगेवाडी ते पिंपरी आणि परत असा मोफत मेट्रो प्रवास (जॉय राईड) यावेळी घडविण्यात आला.

जनतेचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मोदींनी योगा दिन साजरा करण्यास सांगितले आहे. त्यासाठी येथे आलो, असे राणे म्हणाले. योगातून निरोगी भारत बनू शकतो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. योगा नुसताच पाहिलेल्या मिडीयाकर्मींनी तो करावा, असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in