शरद पवारांचा एक निर्णय...आज दोन लाख कोटींची होतेय उलाढाल...

त्या निर्णयामुळे आज दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल या परिसरात होत आहे.
Hinjewadi IT park-Sharad Pawar
Hinjewadi IT park-Sharad PawarSarkarnama

बारामती : हिंजवडीच्या (Hinjewadi) परिसरात नानासाहेब नवले यांनी साखर कारखान्याची जागा सॉफ्टवेअर पार्कसाठी देऊ करण्याचा एक निर्णय घेतला. पण, त्या निर्णयामुळे आज दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल या परिसरात होत आहे. औद्योगिकीकरणाला चालना देणारे असे निर्णय होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.(Nanasaheb Navle accepted Sharad Pawar's decision and Hinjewadi became IT park)

बारामती मर्चंटस असोसिएशनने आयोजित केलेल्या भाषणात शरद पवार यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, नानासाहेब नवले यांनी साखर कारखाना उभारण्यासाठी मला भूमिपुजनाला बोलावले होते. त्या कार्यक्रमाअगोदर मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी पुण्याशेजारी सॉफ्टवेअर उद्योगासाठी जागा हवी आहे, यात मोठा वाव आहे, असे भेट घेऊन सांगितले होते, त्यामुळे भूमिपुजन कार्यक्रमातच नानासाहेब नवले यांना या जागी तुम्ही कारखाना सुरू करु नका. या जागेऐवजी तुम्हाला पर्यायी जागा देतो, तेथे तुम्ही कारखाना सुरु करा, असे सुचविले.

Hinjewadi IT park-Sharad Pawar
बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि हर्षवर्धन पाटलांचे जावई उतरणार राजकारणात

नानासाहेब नवले यांनीही तत्काळ ती विनंती मान्य करत त्यांच्या कारखान्याची जागा सॉफ्टवेअर उद्योगासाठी देऊ केली. याचा परिणाम असा झाला की पुण्याचा सॉफ्टवेअर उद्योगाची उलाढाल व निर्यात आज दोन लाख कोटी रुपयांवर गेलेली आहे. केवळ एक छोटासा बदल करण्यास सांगितल्याने हे चित्र बदलले. जागा मिळालेली असतानाही मराठा चेंबरच्या विनंतीवरुन नवले यांनी त्यांच्या कारखान्याची जागा बदलली. आज या निर्णयामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला असून पुणे पंचक्रोशीतील अर्थकारण सशक्त झाले आहे. ज्या निर्णयामुळे पुण्याची समृध्दी वृध्दींगत झाली, त्या निर्णयांपैकी हा एक आहे, असे पवार यांनी या वेळी नमूद केले.

Hinjewadi IT park-Sharad Pawar
केंद्राच्या कररचनेवर शरद पवार नाराज; थेट मोदींवर सोडले टीकास्त्र

त्या निर्णयानंतर हिंजवडी परिसरात अनेकांनी सॉफ्टवेअर उद्योगांची उभारणी केली. आज दोन लाख लोक या ठिकाणी काम करतात. उद्योगांना अशा पध्दतीने चालना देण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी या प्रसंगी बोलून दाखविली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in