Nana Patole : कोण कुणाला भेटतं आणि कोण कुणाचा मुडदा पाडतो, हे आपण बघतच आलो आहोत !

हेच लोक पूर्वी दहा वेळा मातोश्रीवर जात होते.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

पुणे : केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारला महागाई कमी करण्यासाठी सुबुद्धी दे, अशी प्रार्थना विघ्नहर्त्या गजाननाला केली, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज सांगितले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेण्यासाठी ‘शिवतीर्थ’ या ठाकरेंच्या निवासस्थानी जाणाऱ्या भाजपावरदेखील त्यांनी टीका केली. याआधी हे लोक अशाच पद्धतीने ‘मातोश्री’वर जात होते. कोण कुणाला भेटतं आणि कोण कुणाचा मुडदा पाडतो, हे आपण बघतच आलो आहोत, टीका पटोले यांनी केली.

Nana Patole
मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील गणपती मंडळांना आज पटोले यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. पटोले म्हणाले, ‘‘ प्रत्येकजण गणेशोत्सव साजरा करीत असतो.आपल्या प्रत्येकासाठी हे आनंदाचे दिवस असतात. कोरोनामुळे आम्ही आमचा धर्म आमची संस्कृती या सगळ्या पासून दुरु झालो होतो. मात्र, सण साजरे करताना सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या महागाईचा विचार करण्याची गरज आहे. सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे महागाई कमी करण्याची सुबुध्दी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारला दे, अशी प्रार्थना मी विघ्नहर्त्या गजाननाकडे केली आहे.’’

Nana Patole
राम शिंदेचे रोहित पवारांना आव्हान : राजीनामा द्या, होऊन जाऊ द्या निवडणूक

भाजपा नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी सुरू असलेल्या भेटीबाबत बोलताना पटोले यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘ हेच लोक पूर्वी दहा वेळा मातोश्रीवर जात होते. त्यामुळे कोण कुणाला भेटतं आणि कोण कुणाचा मुडदा पाडतो हे आपण बघतच आलो आहे. त्यामुळे मी यात पडणार नाही. देशात सर्वाधिक महागाई आपल्या राज्यात आहे. महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्या, इतकीच माझी मागणी आहे.’’

देशात एकप्रकारचा दहशतवाद सुरू आहे. लोकशाहीमध्ये लोकांची मत मारण्याचा अधिकार यांना मिळाला आहे का, असा प्रश्‍न पटोले यांनी केला. लोकांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करून सत्तेचा माज आल्यासारखे काहीजण वागत आहेत. मात्र, यांचा माज उतरवायला वेळा आल्यावर जनता मागे पुढे बघणार नाही, अशी टीका पटोले यांनी केली. कोण कुठली महापालिका जिंकेल हे येणारा काळ सांगेल. या लोकांनी राज्याची सत्ता ज्या पद्धतीने घेतली. त्यामुळे प्रशासन देखील दहशतीमध्ये आहे. असा दहशतवाद आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पाहात आहोत, अशी टीका पटोले यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com