Devendra Fadnavis : नाना पटोले माझे खरे मित्र; असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

Uddhav Thackeray : पवारांच्या पुस्तकाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंना चिमटे
Nana Patole, Devendra Fadnavis
Nana Patole, Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra politics : महाविकास आघाडीचे सरकार खंडणीखोर होते. त्या सरकारमधील मंत्र्यांचे थेट संबंध 'अडरवर्ल्ड'मधील 'डॉन'शी होते. त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्यांमुळे अनेकांना आपली मंत्रीपदे सोडावी लागली. त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. ते सरकार स्थापन कसे झाले, आणि त्याचे विसर्जन कसे झाले, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

उपमुख्यमंत्री फडणवीस पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाही समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, "कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने ज्यांच्या एकही उमेदवार निवडणून आला नाही, त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. ज्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही, ते आनंद साजरा करत आहेत. आता ती मंडळी आगामी निवडणुकीत महाराष्ट्र राज्याकत कर्नाटक फॉर्म्यूला अवलंबविण्याची भाषा करत आहेत. पण त्यांना सांगतो की देशात फक्त मोदी फॉर्म्यूला चालतो."

Nana Patole, Devendra Fadnavis
Amarsinh Pandit On Kendrekar : केंद्रेकरांच्या सूचनेचे सर्वत्र कौतुक, पण अमरसिंह पंडित म्हणतात, दहा हजारच का ?

यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाना पटोले माझे खरे मित्र आहेत, असे विधान केले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर फडणवीस यांनी त्याचे कारणही स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, "२०१७ मध्ये उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याला पोलीस दलात घेण्यासाठी माझ्याकडे पाठविले होते. त्यावेळी त्याच्या फाईलवर त्याला मी पोलीस दलात घेणार नाही, असे लिहून नकार दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकारमध्ये वाझेला पोलीस दलात घेण्यात आले. परमबीर सिंहांनाही त्यांनी घेतले. त्यानंतर त्यांनीच सरकावर वसुलीचा आरोप केले. दरम्यान, विरोधी पक्षनेता म्हणून मी मनसुख हिरेन यांची हत्या शोधून काढली. त्यानंतर सरकारचे काळेबेरे बाहेर आहे. आता कालपरवाही नाना पटोले (Nana Patole) यांनी विस्मृतीत गेलेले आंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांबाबत वक्तव्य केले. त्यामुळे नाना पटोले माझे खरे मित्र आहेत. लोक विसरले की ते मनसुख हिरेन यांचा विषय काढतात."

Nana Patole, Devendra Fadnavis
Sinnar APMC News : वाजे गटामुळे नव्हे गाफील राहिल्याने आमदार कोकाटेंची सत्ता हुकली?

फडणवीस यांनी महाविकास आघडीवर (MVA) घणाघात केला. तसेच शरद पवार यांच्या पुस्तकातील संदर्भ देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, "अडीच वर्षे एक सरकार पाहिले, ते विश्वासघातकी होते. खंडणीखोर होते. त्यावेळचे मुख्यमंत्र्यांना काही तास काम करताना पाहिले. पोलीसांना वसुली करताना पाहिले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकातही स्पष्ट केले आहे."

Edited by Sunil Dhumal

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in