Nagaland Election Result 2023 Live : ईशान्येतील तीन राज्यांमध्ये मतमोजणी सुरु

Nagaland and Meghalaya and Tripura Election : नागालँड व मेघालय दोन्ही राज्यात प्रत्येकी ६०-६० जागा आहेत.
Nagaland, Meghalaya and Tripura Election
Nagaland, Meghalaya and Tripura Election sarkarnama

Nagaland and Meghalaya and Tripura Election Result 2023 : महाराष्ट्रातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसोबत ईशान्येतील तीनही राज्यामधील निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.

नागालँड व मेघालय आणि त्रिपुरामध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. विधानसभेसाठी नागालँड व मेघालय दोन्ही राज्यात प्रत्येकी ६०-६० जागा आहेत.

नागालँडमध्ये जुन्हेबोटो जिल्ह्यातील आकुलुटो जागेवर भाजप उमेदवार काजहेटी किन्मी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर मेघालयमध्ये एका उमेदवाराच्या निधनामुळे येथील निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

Nagaland, Meghalaya and Tripura Election
Pune By Election Result : कसब्यात रासने की धंगेकर ; चिंचवडचा नवा आमदार कोण ?

त्यामुळे आता दोन्ही राज्यात ५९-५९ जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. नागालँड विधानसभेचा कार्यकाळ 12 मार्च रोजी संपणार आहे. त्याचवेळी, मेघालयातील विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च आणि त्रिपुरामध्ये 22 मार्च रोजी संपत आहे.

मेघालयात ३६९ उमेदवारांपैकी ३६, नागालँड १८३ पैकी ४ महिला उमेदवार आहेत. सीमा वाद हा मेघालयात संवेदनशील मुद्दा आहे. या मुद्दावरुन निवडणुकीचा प्रचार सुरु होता. त्याचा परिणाम या निवडणूक दिसणार आहे.

भाजपने मेघालयातील सर्वच 60 विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर नागालँडमध्ये 2018 च्या निवडणुकीत NDPP (राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) आणि भाजप यांच्यात 40:20 असा जागा वाटपाचा फॉर्म्युल्या ठरला होता. हा फॉर्म्युल्या पुढेही कायम ठेवण्यात आला आहे.

Nagaland, Meghalaya and Tripura Election
Pune Bypoll News : ज्योतिषाचे भाकीत खरे ठरणार ? ; भाजप चिंचवडमध्ये गड राखणार, पण कसब्यात..

त्रिपुरामध्ये 2018 मध्ये 90% मतदान झाले होते आणि भाजपने सरकार स्थापन केले होते. यावेळी मतदानाचा आकडा 4% कमी आहे. यावेळी राज्यात एकूण 3,337 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या निवडणुकीत 28.13 लाख मतदारांनी 259 उमेदवारांचे भवितव्य ठरवले.

यापूर्वी 2018 मध्ये 59 जागांवर निवडणूक झाली होती. 35 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यासह भाजपने डाव्यांचा 25 वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. पक्षाने बिप्लब देव यांना मुख्यमंत्री केले, परंतु मे 2022 मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in