
MVA and Vanchit : आजच्या क्षणाला वंचित महविकास आघाडीचा (MVA) भाग नाही.आम्ही शिवसेनेशी युती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आले तर विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही २००हून अधिक जागांवर विजय मिळवू. ते आले नाही तर १५० जागा जिंकू, असा दावा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज पुण्यातील सभेत केला आहे.
यावेळी आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा भाग होण्यासाठी सकारात्मकता दाखविली आहे. आंबेडकर म्हणाले की, "आजच्या क्षणाला वंचित महविकास आघाडीचा भाग नाही आम्ही शिवसेनेशी (Shivsena) युती केली आहे.
सध्या आम्ही शिवसेनेशी युती केली आहे. महाविकास आघाडीचा भाग होण्यासाठी उद्धव ठाकरे हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी बोलणार आहेत. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीकडून (NCP) निरोप येईल तेव्हा आम्ही आम्ही बसून ठरवू. त्यानंतर महाविकास आघाडीची पहिली सभा होईल."
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या विधानांवरून राजकीय वर्तुळांतून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. यातून आमची प्रसिद्धी होत असल्याचे सांगून अशा वक्तव्यांचाही यावेळी त्यांनी समाचार घेतला. आंबेडकर म्हणाले की, "आमच्यावर अजून टीका करावी. त्यातून आमची प्रसिद्धी होणार आहे. त्याचा आम्हाला फायदाच होणार आहे."
शेवटी आंबेडकर यांनी भाजपचे दिवंगत नेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण काढली. त्यांच्यासारखा देशाचं नेतृत्व कुणीही केलं नसल्याचा उल्लेख केला. आंबेडकर म्हणाले, "देशाचं नेतृत्व करणारे व्यक्ती म्हणजे अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpeyi). त्यांच्यानंतर कुणीही तसं नेतृत्व करणारं आलं नाही."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.