भोंग्याच्या वादावर मुस्लीम संघटनेने घेतला मोठा निर्णय...

शांतता, सुव्यवस्था राखली जावी, क्षुल्लक कारणांमुळे वाद नको,अशी भूमिका मुस्लीम संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे.
भोंग्याच्या वादावर मुस्लीम संघटनेने घेतला मोठा निर्णय...
Muslim organizationsSarkarnama

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता 21 एप्रिल) पुण्यात (Pune) मुस्लिम संघटनांची (Muslim organizations) बैठक घेतली असून यामध्ये धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर आवाजाच्या मर्यादा ही कायद्यानुसार पाळली जाईल. तसेच, सर्वच धर्माच्या धार्मिक स्थळांनाही अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन व मदत करण्याची आमची भूमिका असल्याचे अवामी महाजचे अध्यक्ष पी.ए. इनामदार यांनी म्हटले आहे. अवामी महाझ सामाजिक संघटनेच्या वतीने आझम कॅम्पस येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

Muslim organizations
सुप्रिया सुळे यांना पंढरपुरात ब्राह्मण समाजाकडून घातला घेराव

पी.ए. इनामदार म्हणाले की, एका आजानसाठी एक ते दिड मिनिटाचा वेळ लागतो. अशी पाच वेळच्या नमाजसाठी दिवसभारत पाचवेळा आजान दिली जाते. न्यायालय व शासनाच्या नियमानुसार आजानवेळी आवाजाबद्दल अंमलबजावणी आम्ही करणार आहे. पुणे शहरात जवळपास चारशे ते पाचशे मशिदी आहेत. मशिदीवर लाऊडस्पीकर लावण्याबाबत परवानगीही घेण्यात येते. ज्यांनी नोंद केली नाही त्यांनी नोंद करावी, यासाठी अर्ज देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शांतता आणि सुव्यवस्था राखली जावी, अशीच आमची भूमिका आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंपर्क अधिकाऱ्याकडे हे अर्ज देण्याची सुविधा असून वक्फ बोर्डाचे प्रमाणपत्र जोडावे, असे अॅड. अयूब शेख यांनी यावेळी सांगितले. आवाजाची मर्यादा नियमानुसार व कायद्याच्या तरतूदी नुसार ठेवल्या जातील, असे यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी सांगीतले. यावेळी आरपीआयचे अॅड. अयूब शेख, नुरुद्दीन सोमजी, अॅड. शेरकर, वाहिद बियाबानी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

Muslim organizations
शिवसेना आमदाराच्या मुलानंच केला रथावर हल्ला! भाजपचा खळबळजनक आरोप

मशिदींसाठी भोंग्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज पाठवलेले आहेत. त्यापैकी अनेक ठिकाणी परवानगी असून मशिदींचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली जात आहे. कायदा असेल तर सगळयानी अंमलात आणला पाहिजे मग तो मंदिरात असो किंवा इतर धर्माच्या प्रार्थना स्थळांसाठी सर्वांना ही नियमावली माहिती असावी. इतर धर्माच्या धर्मस्थळांनाही या परवानगीसाठी कायदेशीर प्रक्रियेसाठी मदत करू, असे संघटवेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात मुबंई व अन्य महापालिका निवडणुका आलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही मुद्दे पुढे आणले जात असले तरी शांतता, सुव्यवस्था राखली जावी, क्षुल्लक कारणांमुळे वाद नको,अशीच आमची भूमिका आहे. त्यामुळे ही बौठक सर्व सामाजिक कार्यकर्ते अन नगरसेवक व इतर लोकांना नियमावली माहिती देण्यासाठी घेण्यात आल्याचे यावेळी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. पुणे शहर व महाराष्ट्र राज्य शांतताप्रिय आहे आणि राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.