Kasba By Election : मुस्लिम नेत्याचं शरद पवारांच्या उपस्थितीतच वादग्रस्त विधान; भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली

BJP Vs NCP : ...तोपर्यंत आपण संघ आणि मोदींना पराभूत करू शकणार नाही!
Usman Hiroli
Usman Hiroli Sarkarnama

Pune News : कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. याचवेळी आरोप प्रत्यारोप, रोड शो, भेटीगाठी, बैठका यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कसब्यातील अल्पसंख्याकांच्या मेळाव्यातून मुस्लिम नेते व काँग्रेसच्या माजी नगरसेवकानं वादग्रस्त विधान केलं आहे. यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी अल्पसंख्याक मेळाव्याचं आयोजन केलं होतं.

या मेळाव्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक उस्मान हिरोली(Usman Hiroli) यांनी येत्या 26 तारखेला मतदान आहे. जेवढी लोकं दुबईत गेली असतील, सौदीला गेली असतील त्या सर्वांना बोलवा. सर्वांकडून मतदान करून घ्या. ज्यांचा मृत्यू झाला त्यांनाही 26 तारखेला हजर करा आणि मतदान करायला सांगा. जोपर्यंत मतदान करण्यात आघाडी घेणार नाही तोपर्यंत आपण संघ आणि मोदींना पराभूत करू शकणार नाही असं वादग्रस्त विधान हिरोली यांनी केलं आहे.

Usman Hiroli
Patole : घाबरलेल्या मोदींकडून आधी काँग्रेस नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे आता पवन खेरांना अटक !

उस्मान हिरोली यांच्या भाषणावरुन भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), केशव उपाध्ये, चित्रा वाघ यांनी हिरोली यांच्या भाषणावर जोरदार टीका करताना राष्ट्रवादीवरही निशाणा साधला आहे. त्याला राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळावा आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक हिरोली यांच्या भाषणावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशाप्रकारे मतांचं ध्रुवीकरण करत असतील आणि मोदींना पराभूत करण्यासाठी मृत मुस्लिमांनाही मतदान करण्यास सांगत असतील तर हे कोणत्या लोकशाहीत बसतं? याचा निषेध होणारच आहे. ध्रुवीकरण करण्याचं काम राष्ट्रवादीचं सुरू आहे. ते खपवून घेणार नाही. राष्ट्रवादी(Ncp)कडून जातीयवादी राजकारण सुरू आहे अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी टि्वटद्वारे निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केलं जातंय आणि दुबई, सौदीतून मतदार आणा म्हणतात. मेलेल्यांनाही ‘जंग’साठी ‘हाजीर’ करा म्हणतात… इतकी वाईट अवस्था राज्यात राष्ट्रवादीची कधीच नव्हती…हा तर एकप्रकारे जिहादच..!, अशी टीका टि्वटद्वारे वाघ यांनी केली आहे.

Usman Hiroli
Pune : कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीत आज शेवटच्या दिवशी 'या' तोफा धडाडणार

राष्ट्रवादीची भाजपवर टीकेची झोड

राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हिरोली यांच्या विधानाचं समर्थन करतानाच भाजपवर पलटवार केला आहे.

जगताप म्हणाले, वाघ यांच्याकडून मुद्दाम हिरोली यांच्या विधानाला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते काहीही चुकीचं बोललेले नाहीत. कसबा मतदारसंघातील 1600 मतदार हे दुबई आणि कुवेतमध्ये राहतात. त्यांना बोलवण्याचा हिरोली यांचा प्रयत्न होता. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे विधान बिलकुल केलं नाही. मात्र, चित्रा वाघ भाजपचा अजेंडा चालवत आहेत. तसेच शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर बोलणं चुकीचं आहे असंही जगताप म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in