महापौर मोहोळ, जयंत पाटलांच्या भेटीला गेले; पण...

पुणेकरांच्या दबावामुळे भितीपोटी जलसंपदा मंत्र्यांनी पाणी कपात रद्द केली.
Jayant Patil, Murlidhar Mohol
Jayant Patil, Murlidhar Moholsarkarnama

पुणे : पुण्याच्या पाणी प्रश्‍नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांची वेळ घेऊन पाच वाजता सिंचन भवन येथे गेलो होतो. तासभर वाट पाहिली. मात्र, पाटील यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन थेट पत्रकार परिषदेला गेले. त्या मुळे मी सिंचन भवन येथून निघून आलो. माझ्या वैयक्तीक कामासाठी नाही तर पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पूर्वकल्पना देऊन भेटण्यासाठी गेलो होते. तरीही भेट झाली नाही, ’’ अशा शब्दात महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी नाराजी व्यक्त केली.

Jayant Patil, Murlidhar Mohol
फडणवीसांच्या आडून चंद्रकांत पाटलांचीच मुख्यमंत्री होण्याची मनीषा

दरम्यान, पुणेकरांच्या दबावामुळे भितीपोटी जलसंपदा मंत्र्यांनी पाणी कपात रद्द केली. याचे आम्ही स्वागत करतो, असा खोचक टोला मोहोळ यांनी लावला पाटील यांना लगावला. जयंत पाटील यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमध्ये मला जायचे नाही, पण दोन दिवसांपूर्वी तुमच्या खात्याने आदेश काढून पोलिस बंदोबस्तात पाणी कपात करणार असल्याचे सांगितले. तरीही पाणी कपातीचा कोणताही प्रस्ताव नव्हता, असे मंत्री सांगत आहेत, असेही मोहळ म्हणाले.

Jayant Patil, Murlidhar Mohol
विश्वजित कदमांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी ताकदीने निवडणूक लढवणार

हे राजकारण सुज्ञ पुणेकर बघत आहेत. भामा आसखेडचे पाणी मिळाले म्हणून खडकवासल्याचे पाणी कपात केली जात आहे. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायचा काय संबंध. वड्याचे तेल वांग्यावर काढत असल्याची टीका मोहोळ यांनी केली. दरम्यान, पाटील यांना महापौर कशासाठी भेटणार होते, हे मला माहिती नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले. पत्रकार परिषद संपल्यानंतर मी त्यांना भेटेल. तर जयंत पाटील यांच्या खुलाशानंतर महापौरांनी या प्रकरणातून माघार घेतली. असेही जगताप म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com